Tata Asataf
Description
असाटाफ या कीटकनाशकामध्ये ऍसिफेट 70% डब्ल्यू पी हा ऑरगॅनोफॉस्फेट गटातील स्पर्शजन्य किटकनाशक घटक असतो. याचा वापर फवारणीद्वारे केल्यास ते पानांवर एकसारखे पसरते व पानांवर रासायनिक थर तयार करते, ज्यामुळे पानांवर असणाऱ्या किडींचा नायनाट होतो व पुढील काही दिवस किडींवर नियंत्रण मिळते. जेव्हा एखादी कीड या कीटकनाशकाच्या संपर्कात येते तेव्हा ह्या किडीच्या मज्जासंस्थांवर विपरीत परिणाम करते परिणामी किडी अपंग होऊन मरण पावतात.या कीटकनाशकाचा वापर फवारणी,आळवणी अशा दोन्ही प्रकारे करता येतो.कोणतीही कीड यायच्या आधी ती कीड येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रण व आल्यावर उपचारात्मक नियंत्रण म्हणून याचा वापर केला जातो. याचे प्रमाण फवारणीसाठी एक ग्रॅम प्रति लिटर व आळवणीसाठी एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घ्यावे. याचा वापर सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांमध्ये केला जातो.हे रस शोषक किडी व अळी गटातील किडींवर नियंत्रण करते. वांगी पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या रसशोषक किडींवर, शेंडाअळी या किडीवर प्रभावी नियंत्रणासाठी या कीटकनाशकाचा वापर केला जातो.कांदा पिकांमध्ये याचा वापर पातीमध्ये असणाऱ्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो.