Taba
Description
Taba हे ken biosys या कंपनीचे पोषक उत्पादन आहे.यामध्ये जिब्रेलिक ऍसिड 0.001% असते. याचा वापर आपण फवारणी मध्ये करायचा आहे,फवारणीसाठी याचे प्रमाणे 1 ml प्रति लिटर असे घ्यावे.याचा वापर सर्व पिकांवर करता येतो.
याचा वापर केल्यामुळे पिकांची उंची वाढते,बियाण्यांची उगवण क्षमता वाढते,फुलांची संख्या वाढते फळांचा आकार वाढतो.हे पिकावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करून वनस्पतीच्या अंतर्गत प्रक्रिया जलद गतीने करण्यास मदत करते.
याचा वापर ऊस पिकात पहिल्या 90 दिवसात दोन वेळा केलास पाणी हिरवीगार होतात उसाची जोमदार वाढ होते. भाजीपाला पिकांत याचा वापर फुलवस्थेत केल्यास फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही भाजीपाला पिकांत याचा वापर फळ अवस्थेत केल्यास फळांचा आकार वजन वाढण्यास मदत होते. हे कोणत्याही पिकास पाणी कमी पडल्यानंतर किंवा जास्त झाल्यानंतर येणारा ताण कमी करून त्या विकास तग धरण्यास मदत करते.