![Mulching Paper - FarmSpot](https://www.farmspotagro.com/wp-content/uploads/2023/05/mulching-packshot-farmspot.jpg)
Mulching Paper
Description
कोणतेही पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने मल्चिंग पेपर चे महत्व खूप आहे. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे तण नियंत्रण करण्यासाठी मदत होते. जेव्हा आपण जमिनीवर मल्चिंग पेपर पसरतो तेव्हा, सूर्यप्रकाश जमिनीवर डायरेक्ट येत नाही आणि त्यामुळे तनांना सूर्यप्रकाश भेटत नाही व त्यांची वाढ खुंटते आणि तेथे तण उगवत नाही.
त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीत होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे जमिनीतला ओलावा टिकून राहतो त्यामुळे आपण कमी पाण्यात सुद्धा जास्त उत्पन्न घेऊ शकतो.
मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीच्या तापमानाचा चढ-उतार कमी होतो व जमिनीचे तापमान संतुलित राहते आणि त्यामुळे पिकांवर येणाऱ्या जैविक व अजैविक ताण कमी होतो. त्याचबरोबर अशा प्रकारे मल्चिंग पेपर चा वापर केल्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित राहते. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो व जमिनीतील जिवाणूनची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.
मल्चिंग पेपर हा सिल्वर ब्लॅक, व्हाईट ब्लॅक या रंगात किंवा ट्रान्सपरंट रंगामध्ये उपलब्ध असतात. मल्चिंग पेपर हे 4 foot /5 foot size मध्ये उपलब्ध असतात. तसेच ते वेगवेगळ्या मायक्रोन मध्ये सुद्धा उपलब्ध असतात जसे की 16 micron, 20 micron, 25 micron, 30 micron..