
Karate
Description
कराटे या कीटकनाशकामध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रीन हा पायरॉइड्स या गटातील आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक घटक असतो. फवारणी द्वारे दिल्यानंतर हे कीटकनाशक पानांवर एकसारखे पसरते व पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषले जाते. जेव्हा रसशोषक किडी व अळी गटातील किडी या कीटकनाशकाच्या संपर्कात येतात, तेव्हा ते किडीच्या चेतासंस्थेवर विपरीत परिणाम करते,यामुळे कीड आपोआप मरण पावते. याचा वापर फवारणीद्वारे, आळवणीद्वारे व ठिबकद्वारे देण्यासाठी केला जातो. हे कीटकनाशक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी केला जातो. याचे प्रमाण फवारणीसाठी एक ग्रॅम प्रतिलिटर, आळवणीसाठी एक ग्रॅम प्रतिलिटर आणि ठिबकद्वारे देण्यासाठी 250 ग्रॅम प्रति लिटर असे घ्यावे. याचा वापर सर्व भाजीपाला पिकांमध्ये करावा. हे सर्व प्रकारच्या रसशोशक किडींवर व अळी गटातील किडींवर प्रभावी नियंत्रण करते. याचा वापर कांदा पिकात actra या कीटकनाशकाबरोबर केल्यास रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.