![Indofil M 45 Packshot - FarmSpot](https://www.farmspotagro.com/wp-content/uploads/2023/05/indofil-m45-packshot-farmspot.jpg)
Indofil M 45
Description
Indofil M-45 या बुरशीनाशकामध्ये मॅंकोझेब 75% WP हा डायथायोकार्बोमेट या गटातील स्पर्शजन्य रासायनिक घटक असतो .हे बुरशीनाशक फवारणीनंतर पानांवर व आळवणी किंवा ठिबक द्वारे दिल्यानंतर मुळांवर एकसारखे पसरते.
हे मुळांवर पानांवर एक रासायनिक थर तयार करते,ज्यामुळे अगोदर पासून पानांवर व मुळांवर असणाऱ्या बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात. तसेच काही दिवस नव्याने कोणत्याही बुरशीचे बीजाणू पानांवर व मुळांवर अंकुरत नाहीत.
हे बुरशीच्या चयापचाय क्रियेमध्ये व पेशी विभाजनामध्ये बाधा आणते,तसेच हे बुरशीच्या ATP संश्लेषणामध्ये आवश्यक असणाऱ्या एन्झाईम्सच्या कार्यावर विपरीत परिणाम करते ,ज्यामुळे बुरशीचे बीजाणु निष्क्रिय होतात. या बुरशीनाशकाचा वापर कोणताही बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व आल्यावर उपचारात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. या बुरशीनाशकाचा वापर आपण फवारणीद्वारे,आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे सुद्धा करता येतो.
या बुरशीनाशकाचे प्रमाण फवारणीसाठी दोन ग्रॅम प्रति लिटर,आळवणीसाठी दोन ग्रॅम प्रतिलिटर व ठिबकद्वारे देण्यासाठी एक ग्रॅम प्रति एकर असे घ्यावे. याचा वापर सर्व पिकांमध्ये(हंगामी पिके,भाजीपाला पिके,फळ पिके,ऊस,आले व इतर पिके करता येतो. याचा वापर पीक फूल अवस्थेत असताना करणे टाळावे नाहीतर फुलगळ होण्याची शक्यता असते.
हे बुरशीनाशक लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा,पानांवर येणारे सेप्टोरिया काळे ठिपके,पानांवर येणारे राखाडी ठिपके,डाऊनी,रोप मर,फ्युसारियाम मर,फांदीमर यांसारख्या बुरशीजन रोगांवर प्रभावी नियंत्रण करते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांत सुरुवातीच्या पहिल्या फवारणी मध्ये केल्यास पानांवर येणारे सेप्टोरिया काळे ठिपके,लवकर येणारा करपा यांसारख्या रोप रुझण्याच्या अवस्थेत येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रण मिळते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांत पहिल्या आळणीमध्ये मेटलएक्झिल या बुरशीनाशकाबरोबर करावा,ज्यामुळे रोप लागवडीनंतर पिथियम बुरशीमुळे होणाऱ्या रोपमर या बुरशीजन्य रोगावर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांत येणाऱ्या फ्युझारियम मर व फायठोपथोरा मर यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर सर्वसाधारणपणे तीस दिवसांनी मेटलएक्झिल या बुरशीनाशकाबरोबर जोडीने करावा.
या बुरशीनाशकाचा वापर कोणत्याही बियाण्याच्या बीजप्रक्रियेसाठी केल्यास बियाण्याचे जमिनी असणाऱ्या बुरशींपासून बचाव होतो.