![Drip Irrigation Pipe - Farmspot](https://www.farmspotagro.com/wp-content/uploads/2023/05/drip-irrigation-pipe-packshot-farmspot.jpg)
Drip Irrigation Pipe
Description
ठिबक सिंचन ही थेट रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची एक पद्धत आहे, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. पाण्याची 50 टक्के बचत होते, त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न घेऊ शकतो. या सिंचन पद्धतीद्वारे पिकास गरजेनुसार पाणी देता येते.
ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते नियंत्रण पद्धतीने पाणी दिल्याने शेतामध्ये येणारे तण कमी प्रमाणामध्ये येते, त्याचबरोबर जमिनीची धूप कमी प्रमाणात होते, थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वापसा कंडीशन राहिल्यामुळे मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते, ज्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येते.
ठिबक सिंचनामध्ये विविध प्रकार येतात ज्यामध्ये Non lSI व ISI ठिबक असे दोन प्रकार येतात. त्याचबरोबर 16mm व 20 mm अशा दोन प्रकारांमध्ये सुद्धा ठिबक उपलब्ध असतात.
जर आपल्या शेताची लांबी 200 फूट पेक्षा कमी असेल तर 16 mm ठिबक वापरावे व आपल्या शेताची लांबी 200 ft पेक्षा जास्त असेल तर आपण 20 mm चे ठिबक वापरावेत. त्याचबरोबर पाण्याचा डिस्चार्ज नुसार त्यामध्ये दोन प्रकार येतात.
जर आपण भाजीपाला पिके घेत असू तर आपण 2.5 लिटर डिस्चार्ज असणारी ठिबक वापरावे आणि जर ऊस, आले व इतर फळे पिके घेत असाल तर आपण 4 लिटर डिस्चार्ज असणारे ठिबक वापरावे.