Description
कार्यपद्धत
✅यामध्ये Thiophanate methyl हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो. जो फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे व आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांच्या रंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींच्या पडद्याच्या निर्मिती मध्ये व्यत्यय आणून त्याची वाढ रोखते. हे मायक्रोट्यूब्यूल्सच्या संश्लेषणात व्यत्यय आणते, जे बुरशीच्या पेशी विभाजन आणि बुरशीच्या संरचनेसाठी आवश्यक आहे. ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर, नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅फवारणी, आळवणी व ठिबकद्वारे.
शिफारस पिके
भात – ब्लास्ट,शीथ ब्लास्ट
मिरची – भुरी, अँन्थ्राकॉस करपा,फळकुज
टोमॅटो – खोड कुज,पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके,रोप मर
बटाटा – ब्लॅक स्कर्फ,पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके
प्रमाण
फवारणी
✅1 ग्रॅम प्रती लिटर
✅15 ग्रॅम प्रती / पंप (15 लिटर पंप)
✅150 ग्रॅम प्रती एकर फवारणी
बीजप्रक्रिया
✅2.5 ग्रॅम प्रती किलो बियाणे
ठिबक/ड्रेंचिंग
✅500 ग्रॅम प्रती एकर
टिप
✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.