Description
कार्यपद्धत
✅यामध्ये Mancozeb 64% व Metalaxyl 4% हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात. यातील Mancozeb हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक आहे. जो फवारणीनंतर पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर एक रासायनिक थर तयार करते,तसेच आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांवर एकसारखे पसरते व वनस्पतींच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार करते. जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते, तेव्हा हा बुरशीनाशक घटक बुरशीच्या पेशीमधील विविध एन्झाइमॅटिक प्रक्रियांना प्रतिबंध करते. हे बुरशीच्या पेशीमध्ये ऊर्जा उत्पादन, चयापचय आणि श्वसन मार्गाशी संबंधित असलेल्या एन्झाईम्सच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते. या हस्तक्षेपामुळे बुरशीची वाढ व पुनरुत्पादन रोखले जाते. तसेच यातील Metalaxyl हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असल्यामुळे फवारणी द्वारे दिल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो. तसेच आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे आरएनए पॉलिमरेझ एन्झाइमला लक्ष करून बुरशी मधील आरएनएचे संश्लेषण रोखते. आरएनए उत्पादनातील हा व्यत्यय बुरशीजन्य पेशींच्या वाढीच्या आणि पुनरुत्पादनाच्या क्षमतेला बाधा आणतो, तसेच प्रथिने संश्लेषणात व्यत्यय आणते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅फवारणी, आळवणी व ठिबकद्वारे
शिफारस पिके
द्राक्ष – भुरी
बटाटा – उशिरा येणारा करपा
काळी मिरी – फायटोफथोरा
मोहरी – भुरी
मिरची – ओलसर करपा
डाळिंब – पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके, फळकुज
फुलकोबी – भुरी, पानांवर येणारे सरकोस्पोरा ठिपके
प्रमाण
✅फवारणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर
✅आळवणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर
✅ठिबकद्वारे देण्यासाठी 1 kg प्रती एकर
टिप
✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.