Description
कार्यपद्धत
✅यामध्ये Tricyclazole व mancozeb हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात. यातील Tricyclazole आंतरप्रवाही असल्यामुळे पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत शोषले जाते. हा बुरशीनाशक घटक बुरशीतील मेलेनिन बायोसिंथेसिसला प्रतिबंध करते,तसेच संरक्षणात्मक रंगद्रव्याचा थर तयार होण्यास अडथळा आणते.हे बुरशीच्या वनस्पतीच्या ऊतींमध्ये प्रवेश करण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करते, ज्यामुळे बुरशीचे संक्रमण आणि रोगाचा विकास रोखला जातो.तसेच यातील Mancozeb हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असल्यामुळे फवारणीनंतर पानांवर एकसारखा पसरतो व पानांवर एक रासायनिक थर तयार करतो.या बुरशीनाशकाच्या संपर्कात बुरशी आल्यानंतर हे बुरशीच्या पेशींमध्ये विविध एन्झाइमॅटिक प्रक्रियांना प्रतिबंध करते.तसेच बुरशींच्या पेशींमध्ये ऊर्जा उत्पादन आणि चयापचय तसेच श्वसन मार्गाशी संबंधित असलेल्या एन्झाइमच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते.या हस्तक्षेपामुळे बुरशीची वाढ आणि पुनरुत्पादन रोखले जाते.या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅फवारणी
शिफारस पिके व त्यावर येणारे बुरशीजन्य रोग
भात – पानांवर येणारे तांबट ठिपके
मिरची – सरकोस्पोरा पानांवर येणारे ठिपके,पानांवर येणारे अल्टरनारीया ठिपके
प्रमाण
✅फवारणीसाठी 2 ग्रॅम प्रती लीटर
टिप
✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.