Description
कार्यपद्धत
✅यामध्ये Propineb व Iprovalicarb हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात.यातील propineb हा स्पर्शजन्य घटक असल्यामुळे या बुरशीनाशक घटकाच्या संपर्कात जेव्हा बुरशी येते, तेव्हा हे बुरशीच्या पेशीमध्ये अनेक ठिकाणी कार्य करते आणि लिपिड चयापचय श्वसन आणि ऊर्जा उत्पादनात व्यत्यय आणते.ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते.यातील Iprovolicarb हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असल्यामुळे फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो व बुरशीमधील मायटोकॉन्ड्रियल श्वसन प्रक्रियेला प्रतिबंधित करतो व ऊर्जा उत्पादनात व्यत्यय आणतो, ज्यामुळे बुरशी निष्क्रिय होते.या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅फवारणी
शिफारस पिके
बटाटा – उशिरा येणारा करपा
द्राक्ष – भुरी
प्रमाण
✅2.5 ते 3 ग्रॅम प्रति लीटर
टिप
✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.