Description
कार्यपद्धत
✅यामध्ये Mancozeb व Metalaxyl हे दोन रासायनिक बुरशीनाशक घटक असतात.यातील Mancozeb हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक आहे,जो फवारणीनंतर पानांवर व वनस्पतींच्या अवयवांवर एकसारखा पसरते व एक रासायनिक थर तयार करते ,तसेच आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांवर एकसारखे पसरते व वनस्पतींच्या मुळांवर एक रासायनिक थर तयार करते.जेव्हा बुरशी या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते,तेव्हा हा बुरशीनाशक घटक बुरशीच्या पेशीमधील विविध एन्झाइमॅटिक प्रक्रियांना प्रतिबंध करते .हे बुरशीच्या पेशीमध्ये ऊर्जा उत्पादन, चयापचय आणि श्वसन मार्गाशी संबंधित असलेल्या एन्झाईम्सच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते.या हस्तक्षेपामुळे बुरशीची वाढ व पुनरुत्पादन रोखले जाते. तसेच यातील Metalaxyl हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असल्यामुळे फवारणी द्वारे दिल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आतमध्ये शोषला जातो.तसेच आळवणीद्वारे दिल्यानंतर मुळांद्वारे आतमध्ये शोषला जातो. हे आरएनए पॉलिमरेझ एन्झाइमला लक्ष करून बुरशी मधील आरएनएचे संश्लेषण रोखते. आरएनए उत्पादनातील हा व्यत्यय बुरशीजन्य पेशींच्या वाढीच्या आणि पुनरुत्पादनाच्या क्षमतेला बाधा आणतो, तसेच प्रथिने संश्लेषणात व्यत्यय आणते. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
✅फवारणी,आळवणी व ठिबकद्वारे
शिफारस पिके
द्राक्ष – भुरी
तंबाखू – ओलसर करपा, लीफ ब्लाइट
बटाटा – उशिरा येणारा करपा
मोहरी – तांबेरा,अल्टरनारिया ब्लाइट
काळी मिरी – फायटोफथोरा, फळकुज
प्रमाण
✅2 ग्रॅम प्रती लीटर फवारणीसाठी
✅2 ग्रॅम प्रती लीटर आळवणीसाठी
✅1 kg प्रती एकर ठिबकद्वारे
टिप
✅येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
Farmspot is an agritech e-commerce startup that emerged during the COVID-19 lockdown with the goal of revolutionizing the agricultural sector. We prioritize offering a wide range of agricultural products suitable for farmers’ requirements at affordable prices. Our product selection includes fungicides, insecticides, tonics, fertilizers, herbicides, and farming equipment, all carefully chosen for their efficiency and affordability.
What sets Farmspot apart is our dedication to providing crop schedule-based consulting services. We understand that successful farming involves strategic crop planning and management. Therefore, we collaborate closely with farmers to develop customized crop schedules that optimize planting, crop maintenance, and harvesting activities. By aligning these practices with seasonal and regional climatic conditions, we help farmers achieve maximum yield and efficiency while reducing costs and environmental impact.