Description
कार्यपद्धत
Syngenta Foliogold मध्ये Chlorothalonil व Metalxye असे दोन बुरशीनाशक असतात.यातील Chlorothalonil अस्पर्शीजन्य बुरशीनाशकाच्या संपर्कात बुरशी आल्यानंतर हे बुरशीच्या एन्झाईम प्रणाली मध्ये हस्तक्षेप करते. ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते व त्यामुळे बुरशी निष्क्रिय होते यातील Metalxye आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे हे बुरशीच्या पेशींमध्ये प्रवेश करते. व पेशींमधील मायसेलियमची वाढ थांबवते व हॉस्ट्रोरिया व बीजाणूची निर्मिती थांबून बुरशींचा DNA संश्लेषणात हस्तक्षेप करते त्यामुळे बीजाणू निष्क्रिय होतात. या बुरशीनाशकाचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून करायचा आहे.
वापरण्याची पद्धत
फवारणी, आळणी, व ठिबकद्वारे.
शिफारस असणारी पिके व रोग
टोमॅटो – लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा
बटाटा – लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा
प्रमाण
फवारणीसाठी – 2 ग्रॅम प्रति लिटर
आळवणीसाठी – 2 ml प्रति लिटर
ठिबकद्वारे – 1 लिटर प्रति एकर
टिप
येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.