Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

फुजारियम रोपमर (Fusarium Wilt)

जबाबदार बुरशी

Fusarium oxysporum

पोषक वातावरण 
  • वातावरणामध्ये तापमान हे 24°C ते 28°C च्या दरम्यान असते व आद्रता 80% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हा हवामान हे उबदार व दमट असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद गतीने होतो.
लक्षणे 
  • या बुरशीचा प्रथम प्रादुर्भाव हा जिथे खोड जमिनीला चिकटलेले असते तिथे होतो.
  • या भागांवर पांढरे किंवा राखाडी रंगाच्या बुरशीचा थर तयार झालेला दिसतो.
  • जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असूनही झाडे पाण्याच्या ताणाची लक्षणे दाखवतात, त्यामुळे झाड कोमेजून जाते.
  • तसेच रोपांची जुनी पाने खालच्या भागापासून पिवळी पडायला सुरुवात होतात.
  • तसेच रोपांची वाढ कमी प्रमाणात होते व कालांतराने रोपांची वाढ खुंटते.
  • या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यावर रोपांची मर होते.
प्रसार 

या बुरशीचा प्रसार शेताच्या एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या अधिकच्या ओलाव्याद्वारे व पावसाच्या किंवा सिंचनासाठी दिलेल्या पाण्याद्वारे होतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • दोन ओळी मधील अंतर हे जास्त असावे, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर पडेल व जमिन जास्त काळ ओली राहणार नाही. ज्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • कॅल्शियम युक्त पोषक उत्पादनांचा व खतांचा वापर करावा, ज्यामुळे झाडांच्या खोडाचे बाहेरील आवरण हे जाड होईल व ज्यामुळे खोडांना जखमा होणार नाहीत.
  • बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यावर पोटॅश युक्त खतांचा वापर करावा. ज्यामुळे रोपांची बुरशीजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • शेतामध्ये भांगलण करत असताना रोपांच्या खोडाला जखमा होणार नाही याची काळजी घ्यावी.
उपचारात्मक उपाययोजना