शास्त्रीय नाव 

Liriomyza Trifolii

किडींचे जीवनचक्र 

✅नागअळी या किडीचे जीवनचक्र अंडी–अळी-कोष–पतंग असे 4 टप्यात विभागलेले असते.

अंडी अवस्था (Egg)

  • मादी माशी पानांच्या ऊतीमध्ये म्हणजे आतमध्ये अंडी घालते.
  • अंडी लहान, अंडाकृती आकाराची व पांढऱ्या रंगाची असतात आणि ती पानांच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये घातली जातात.
  • अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमानानुसार 2-4 दिवस असतो,उबवण्याचा कालावधी हा वातावरण मध्ये असणारे तापमान व आर्द्रता यावर अवलंबून आहे,आर्द्रता व तापमान जास्त असेल तर अंडी कमी कालावधी मध्ये उबवतात, आर्द्रता व तापमान कमी असेल तर अंडी जास्त कालावधी मध्ये उबवतात.
  • अंडी उबवल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते.

अळी अवस्था (Larva)

  • अंडी उबवल्यानंतर, अळ्या बाहेर येतात व पानांच्या आतमध्ये/ऊतींमध्ये खाणे सुरू करतात.
  • अळींचे विकासाचे तीन टप्पे असतात (विकासाच्या अवस्था).
  • ही अवस्था साधारणतः 5-7 दिवसांची असते.
  • अळ्या रंगाने पिवळसर आणि आकाराने सडपातळ असतात.

कोष अवस्था  (Pupa)

  • पूर्ण वाढलेल्या अळ्या पान सोडून मातीत पडतात आणि तिथे कोष तयार करतात.
  • कोषकरण मातीमध्ये किंवा पानांच्या पृष्ठभागावर होते.
  • कोष तपकिरी रंगाचे आणि अंडाकृती आकाराचे असतात.
  • कोष अवस्था साधारणतः 7-14 दिवसांची असते.

 पतंग अवस्था (Adult)

  • प्रौढ पतंग आकाराने लहान, काळ्या आणि पिवळ्या रंगाचे असतात, आणि त्यांची लांबी साधारणतः 1.3-2.3 मिमी असते.
  • प्रौढ पतंग कोषतून बाहेर पडल्यावर काही दिवसांतच अंडी घालण्यास सुरवात करतात.
  • प्रौढ पतंग अवस्था हि साधारणतः 1-2 आठवडे असते.

✅पूर्ण जीवनचक्र साधारणतः 2-3 आठवड्यांमध्ये पूर्ण होते, जे तापमान आणि आर्द्रता यांच्यासारख्या पर्यावरणीय स्थितींवर अवलंबून असते. या जलद जीवनचक्रामुळे नाग अळी योग्य हवामानात वारंवार पिढ्या निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी सतत त्रासदायक ठरतात.

पोषक वातावरण 
  • नागअळी या किडीच्या विकास आणि पुनरुउत्पादन अनुकुल असलेल्या वातावरणातील परिस्थितीची माहिती.
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व आर्द्रता ही जास्त असते तेव्हा या किडीचा विकास व पुनरुत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
  • जेव्हा दिवस मोठा असतो व रात्र लहान असते, तेव्हा पंतगाची कार्यक्षमता व प्रजननक्षमता वाढते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जेव्हा पाऊस पडत असतो, तेव्हा वातावरणातील आर्द्रता पातळी मध्यम संतुलित असते. ज्यामुळे कीडींचा विकास होतो व प्रादुर्भाव वाढतो, त्याउलट मुसळधार पाऊस पडतो,तेव्हा कीडींचे अळ्या व कोष वाहून जातात. त्यामुळे कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • ढगाळ वातावरणामध्ये आर्द्रता व तापमान वाढते ज्यामुळे कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
प्रादुर्भाव कसा ओळखावा 
  • प्रादुर्भावाची लक्षणे ही पानांवर दिसतात, ज्यामध्ये पानांवर नागमोडी आकाराचे पांढरे चट्टे दिसतात.
नुकसान काय करते 
  • पानांवर आळयांनी खायला सुरुवात केल्यानंतर पानांवर नागमोडी आकाराचे पांढरे चट्टे दिसतात. त्यामुळे पानांमधील हरित कणांचे प्रमाण कमी होते व त्याचा थेट परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होतो. व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो. व रोपांची वाढ खुंटते.
  • पानांना अळ्या खात असताना पानांच्या आतमधील शिरांचे नुकसान होते. या शिरांनमध्ये फोलम व झायलाम पेशी असतात.ज्यामुळे अन्नपूरवठा बंद किंवा कमी होतो. ज्यामुळे रोपांचा विकास थांबतो.या सर्वांचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर, विकासावर व टोमॅटो फळांच्या आकारावर व गुणवत्तेवर होतो. व उत्पादनात घट होते.
  • पानांमध्ये खाणे सुरू केल्यामुळे पानांना जखमा होतात ज्यामुळे त्या जखमांमधून बुरशी व जिवाणू यांचा प्रादुर्भाव होतो.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • लागवडीसाठी रोपांची निवड कारताना प्रादुर्भाव विरहित रोपांची निवड करावी.
  • शेतामध्ये निळे-पिवळे चिकटसापळे लावा. जेणेकरून शेतामध्ये पतंगांची उपस्थिती ओळखता येईल.
  • शेतामध्ये चारही बाजूनी सापळा पिडे (मका,झेंडू) यांची लागवड करा. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या किडींना पतंगांना रोखता येईल.
  • शेतामध्ये चारही बाजूनी इनसेक्ट नेट 7 फुट पर्यंत लावा. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या किडींना पतंगांना रोखता येईल.
  • प्राथमिक प्रादुर्भाव ओळखून नीम ऑइल सारख्या किटकनाशकांचा वापर करा.
  • पोषक वातावरणाचा अभ्यास करून प्रादुर्भाव ओळखून फवारणी करावी.
  • नायट्रोजन युक्त खतांचा वापर कमी करावा. जेणेकरून पाने कोवळी लुसलुशीत होणार नाहीत, व किडी आकर्षित होणार नाहीत.
  • कॅल्शियमयुक्त उत्पादनांचा वापर करावा. जेणेकरून रोपांची प्रतिकारशक्ती वाढेल. ‌‌सॅलिसिलिक युक्त उत्पादनांचा वापर करावा जेणेकरून रोपांची प्रतिकारशक्ती वाढते.