Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकात येणाऱ्या किडी

 टूटा नागअळी (Tuta Absoluta)

शास्त्रीय नाव 

Tuta absoluta

किडीचे जीवनचक्र 

या किडीचे जीवनचक्र हे 4 भागांमध्ये विभागलेले आहे.

अंडी अवस्था 

  • अंडी अवस्था ही सर्वसाधारणपणे 4-6 दिवसांची असते.
  • प्रौढ पतंग टोमॅटो झाडाच्या पानांवर,देठांवर,फळांच्या खालच्या बाजूला अंडी घालतात.

अळी अवस्था 

  • अळी अवस्था ही सर्वसाधारणपणे 10-14 दिवसांची असते.
  • अळ्या अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वनस्पतींच्या पानांमध्ये, फळांमध्ये व देठांमध्ये खायला सुरु करतात.
  • या वाढीच्या टप्यातुन जात असताना, त्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिवळसर किंवा फिकट हिरव्या रंगाच्या असतात.
  • अळ्या आकाराने लहान असतात. जसजसा त्यांचा विकास होतो, तसतसा त्या अळ्या गडद तपकिरी किंवा काळ्या डोक्याच्या फिकट हिरव्या ते पिवळसर रंगाच्या होतात व त्यांच्या शारिरावर पांढरे किंवा पिवळसर रंगाचे पटृटे असतात. अनेकदा त्यांच्या शरीरावर काळे डाग सुद्धा दिसतात.

कोष अवस्था 

  • अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विकसित झालेली अळी कोषामध्ये जाते.
  • कोष अवस्था ही 8-10 दिवसांची असते. कोष हे वनस्पतींच्या अवशेषात किंवा मातीमध्ये आढळतात.
  • त्यांचा आकार लांबलचक व दंड गोलाकार असतो व दोन्ही टोके निमुळती असतात. त्यांचा रंग सुरुवातीला हिरवट व कालांतराने गडद तपकिरी होतो.

पतंग अवस्था 

  • कोष अवस्था पूर्ण झाल्यानंतर कोषातून पतंग बाहेर येतात.
  • पतंग आकाराने लहान असतात.
  • पतंगांच्या पुढच्या पंखावर काळे डाग असलेला चांदीचा राखाडी रंग असतो.
  • पतंग कोषातुन बाहेर आल्यानंतर लगेचच अंडी घालायला सुरुवात करतात.
  • एक मादी सर्वसाधारणपणे संपूर्ण जीवनचक्रात 200 अंडी घालते.
  • पतंग अवस्था 1-2 आठवड्यापर्यंत असते.

या किडीचे संपूर्ण जीवनचक्र 3-4 आठवड्यांमध्ये पूर्ण होते.

 पोषक वातावरण 
  • टूटा नागअळी या किडीचा विकास आणि पुनरुउत्पादन अनुकूल असलेल्या वतावरणीय परिस्थितीची माहिती घेतल्यास नियंत्रण मिळवणे एकदम सोपे जाते.
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C असते व  मध्यम ते कमी आर्द्रता असते, तेव्हा या किडीचा विकास व पुनरुउत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
  • जेव्हा दिवस मोठा व रात्र लहान असते, तेव्हा पंतगांची कार्यक्षमता वाढते व यामुळे कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
प्रादुर्भाव कसा ओळखावा
  • अळ्या पानांत पोखरून राखाडी ते पांढऱ्या रंगाच्या अनियमित रेषा तयार करतात, ज्यामुळे नंतर पाने करपतात.
  • अळी फळांना खोलपर्यंत पोखरतात.
नुकसान काय करते.
  • ही किड अळी अवस्थेत मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. अळ्या रोपांची पाने,रोपांचे शेंडे, नवीन पालवी,फुले खातात.
  • अळ्या पानात पोखरून राखाडी ते पांढऱ्या रंगाच्या अनियमित रेषा तयार करतात. ज्या कालांतराने त्या रेषा करपतात.ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया,वनस्पती श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया विस्कळीत होते,व परिणामी रोपांची वाढ खुंटते.
  • अळ्या रोपांचे खोड सुद्धा पोखरू शकतात. ज्यामुळे झाडाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो.
  • फळांवर जिथून अळ्या बाहेर पडल्या किंवा आत शिरल्या त्या जागी काळ्या रंगाचे डाग दिसतात. या छिद्रातून दुय्यम जंतु प्रवेश करतात, ज्यामुळे फळकुज होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • लागवडीसाठी रोपांची निवड करताना प्रादुर्भाव विरहित रोपांची निवड करावी.
  • शेतामध्ये निळे-पिवळे चिकट सापळे लावा जेणेकरून शेतामध्ये पतंगांची उपस्थिती ओळखता येईल.
  • शेतामध्ये प्रकाश सापळे किंवा फेरोमन सापळे लावा जेणेकरून प्रादुर्भाव ओळखता येईल व काही अंशी नियंत्रण पण मिळेल.
  • शेताच्या चारही बाजूनी इनसेक्ट नेट  7 फुट पर्यंत लावा. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या कीडींच्या पतंगांना रोखता येईल.
  • पोषक वातावरणाचा अभ्यास करून प्रादुर्भाव व शक्यता ओळखून फवारणी करावी.
  • प्राथमिक प्रादुर्भाव ओळखून नीम ऑइल सारख्या किटकनाशकांचा वापर करावा.
नियंत्रणात्मक उपाययोजना