Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकात येणाऱ्या किडी

 काळी कुरतडणारी अळी  (Black Cut Worm)

शास्त्रीय नाव 

Agrotis ipsilon

किडीचे जीवनचक्र

✅या किडीचे जीवनचक्र हे अंडी-अळी-कोष-पतंग असे 4 टप्यात विभागलेले आहे.

अंडी अवस्था 

  • प्रौढ पतंग रोपांच्या पानांवर, देठांवर किंवा रोपांच्या जवळ मातीमध्ये अंडी घालतात.
  • अंडी आकाराने गोलाकार व रंगाने फिकट पांढरी असतात व उबवण्यापर्यंत त्याचा रंग गडद पांढरा होतो.
  • अंडी अवस्था ही 4 ते 10 दिवसांची असते. परंतु तापमान व वातावरणातील इतर घटकांमुळे हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.

अळी अवस्था 

  • अंडी उबवल्यानंतर अळी बाहेर येते.
  • अळी ही राखाडी, काळी किंवा तपकिरी रंगाची असते,आणि तिचे डोके वेगळ्या रंगाचे असते.
  • अळीचा विकास हा अनेक टप्यात विभागलेला असतो.
  • अळी अवस्था पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 आठवडे एवढा वेळ लागतो.

 कोष अवस्था 

  • अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर अळी कोषामध्ये जाते.
  • कोष हे जमिनीत मातीत किंवा जुन्या पिकांच्या अवशेषांत राहतात.
  • कोष सुरुवातीला रंगाने तपकिरी असतात. व कालांतराने प्रौढ  होतील तसे गडद होतात.
  • कोषावस्था ही 2 ते 3 आठवडे असते.

पतंग अवस्था 

  • हे पतंग निशाचर असतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात.
  • हे कोषातुन बाहेर आल्यानंतर काही कालावधीनंतर लगेच जमिनीमध्ये अंडी घालतात.
  • पतंग अवस्था ही 2 ते 3 आठवडे असते.

✅या कीडीचे संपूर्ण जीवनचक्र 4 ते 8 आठवड्यामध्ये पूर्ण होते.

पोषक वातावरण 
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व  आद्रता ही मध्यम ते जास्त असते. तेव्हा या कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • काळी कुरतडणारी अळी या किडीचे पतंग हे निशाचर असतात. आणि जेव्हा रात्री तापमनात वाढ होते, तेव्हा यांची कार्यक्षमता व प्रजननक्षमता वाढते.
  • जेव्हा कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, तेव्हा आद्रता ही मध्यम राहते, व या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा या किडीचे कोष व अळ्या वाहून जातात. व कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रादुर्भाव कसा ओळखावा 
  • याचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी जिथे रोप जमिनीला चिटकते त्या ठिकाणी कट केले आहे का ते पहावे.
नुकसान काय करते 
  • ही अळी रोप लागवड केल्यानंतर कोवळ्या रोपांचे खोड कट करते. ज्यामुळे रोपे कोलमडून जातात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • शेत नांगरतान खोलवर नांगरावे जेणेकरून कीडींचे कोष निष्क्रिय होतील.