Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात सल्फर या अन्नद्रव्यांचा कमतरतेची लक्षणे,कारणे, नुकसान आणि उपाययोजना.

लक्षणे 
  • रोपांच्या पानांच्या शिरांमधील हिरवा रंग कमी होऊन संपूर्ण पाने पिवळी पडतात.
  • सल्फरची कमतरता प्रामुख्याने रोपांच्या नवीन पानांवर दिसून येते. रोपांची नवीन पाने पिवळी पडतात, किंवा त्यांचा रंग फिकट असतो.
  • सल्फरची कमतरता असल्यास पिकांची सामान्य वाढ आणि विकास मंदावतो.
  • पिकाला कमी फुल येतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
कारणे 
  • मातीमध्ये सल्फरची कमतरता असल्यास पिकांना पूरेसा प्रमाणात सल्फर मिळत नाही.
  • जास्त पावसामुळे मतीमधील सल्फर शेताच्या बाहेर वाहून नेले जाते.
  • मातीची PH पातळी जास्त असल्यास सल्फरची उपलब्धता कमी होते.
  • इतर अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सल्फरचे शोषण कमी होते.
नुकसान 
  • सल्फरची कमतरता असल्यास टोमॅटो पिकाचे उत्पादन कमी होते.
  • सल्फरच्या कमतरतेमुळे फळांचा आकार लहान होतो, आणि त्यांची गुणवत्ता कमी होते.
  • सल्फरच्या कमतरतेमुळे पिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • सल्फरच्या कमतरतेमुळे पानांचा तेलकटपणा कमी होतो, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.
उपाययोजना 
  • जमिनीत सल्फरयुक्त खतांचा जसे की अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट यांचा वापर करावा.
  • सेंद्रिय खतांमध्ये सल्फर असल्यास त्यांचा वापर करावा.
  • मातीचे नियमित निरीक्षण करून त्यामध्ये सल्फरच्या उपलब्धेची माहिती द्यावी आणि त्यानुसार योग्य खते वापरावीत.
  • जास्त पाणी दिल्यावर किंवा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास मातीमधील सल्फर शेताच्या बाहेर वाहून नेले जाते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.
  • रोपांवर सल्फर युक्त उत्पादनांची फवारणी करावी.
  • योग्य उपायोजना केल्यावर टोमॅटो पिकात सल्फर ची कमतरता दूर करता येते आणि उत्पादनात वाढ होते.