लक्षणे  

✅ पिथियम रोपमर ही कांदा रोपवाटिकेत वेगवेगळ्या प्रकारे येते.
✅ ही मर प्रामुख्याने पिथियम या बुरशीमुळे होते.
✅ सर्वप्रथम जेव्हा बियाणे जमिनीमध्ये टाकतो किंवा पेरणी करतो, तेव्हा त्या बियाण्यांवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि बियाणे खराब होते व उगवत नाही.
✅ प्रादुर्भाव झाल्यानंतर यामध्ये बियाण्यावर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा थर येतो.
✅ तर काही परिस्थितीमध्ये बियाण्यातून अंकुर व प्रमुख मुळ बाहेर येते,तेव्हा त्या बुरशीचा प्रादुर्भाव त्या नाजूक भागांवर होतो. ज्यामुळे बियाण्यातून अंकुर बाहेर पडतानाच रोपांची मर होते.अशा वेळी त्या अंकुरावर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा बुरशीचा थर दिसतो, तसेच रोप वरून पिवळे पडते.
✅ या दोन्ही प्रकारचा प्रादुर्भाव हा बियाणे पेरणी केल्यानंतर पहिल्या 10 दिवसांमध्ये होतो.
✅ काही परिस्थितीमध्ये रोपे उगवून आल्यानंतर जिथे पान जमिनीला चिकटते किंवा रोपांच्या मुळांवर या बुरशीचा प्रादुर्भाव होतो व रोपे पिवळी पडून कालांतराने अशा रोपांची मर होते.

पोषक वातावरण 

✅ या बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा जेव्हा तापमान हे 25०C ते 30०C च्या दरम्यान असते व आर्द्रता ही 80% पेक्षा जास्त असते तेव्हा मोठ्या प्रमाणावर होतो.

प्रसार 

✅ या  बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीमध्ये असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामार्फत होतो.
✅ ज्या जमिनीच्या सेंद्रिय कर्ब  जास्त आहे,अशा जमिनीत या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात अधिक जलद गतीने होतो.
✅ ज्या जमिनीचा PH हा 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असतो,अशा जमिनीत या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

नुकसान काय होते? 

✅ रोपांची मर झाल्यामुळे सर्वाधिक नुकसान होते. तसेच पुन्हा पेरणी व बियाण्याचा खर्च वाढतो,प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यासाठी आर्थिक खर्च जास्त होतो.

एकात्मिक उपाययोजना 

एकात्मिक उपाययोजना म्हणजे या रोपमर अडचणी बरोबर येणाऱ्या इतर अडचणी  येऊ नये म्हणून एका वेळेस  नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे होय.


बियाणे निवड :
✅एकात्मिक नियोजनामध्ये योग्य प्रकारच्या निरोगी बियाण्यांची निवड केल्यास पिथियम रोपमर बरोबर इतर बुरशीजन्य रोगांवर सुद्धा नियंत्रण मिळेल.कांदा बियाणे निवड कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा बियाणे निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?


जमिनीची निवड
✅अशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी
ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर कोरडी होईल.कारण पिथीयम बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामार्फत होतो.जमिनीची निवड कशा प्रकारे व कशाचा आधारावर करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?


शेतीची मशागत :
✅यासाठी जेव्हा शेताची मशागत करत असतो तेव्हा शेत खोलवर नांगरून घ्यावे व किमान 10 ते 15 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. ज्यामुळे जे जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशीचे बीजाणू आहेत ते  सूर्यप्रकाशामुळे निष्क्रिय होतील. तसेच त्यानंतर फणपाळी मारून जे जुन्या पिकांचे, तणांचे अवशेष काडी कचरा बाहेर येतो. तो शेताच्या बाहेर उचलून टाकावा, ज्यामुळे त्याचबरोबर बुरशीचे बिजाणू सुद्धा शेताच्या बाहेर जातील. अशा प्रकारे आपण इतर बुरशीजन्य रोगांप्रमाणेच या पिथियम रोपमर बुरशीजन्य रोगांवर एकात्मिक नियंत्रण मिळेल.कांदा रोपवाटीकेसाठी शेताची मशागत कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करावे.
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे तो बुरशीजन्य रोग आपल्या शेतात पिकांवर येऊ नये म्हणून उपाययोजना करणे होय. त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.


बीजप्रक्रिया 
✅जर बीज प्रक्रिया केली तर बियाण्याचे उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशीपासून संरक्षण होईल व पिथियम रोपमर  बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल.कांदा बियाण्यावर बीज प्रक्रिया कशा प्रकारे करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?


पाणी नियोजन 
✅या बुरशीजन्य रोगांपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्राथमिक प्रादुर्भाव रोखण्याबरोबर या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होऊ न देणे तितकेच गरजेचे आहे.त्यासाठी जमीन जास्तीत जास्त ओली न राहता कोरडी व वाफसा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे राहिल याची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी मातीचा प्रकार, जलसिंचन प्रकार, व वातावरण यानुसार योग्य प्रकारे पाणी नियोजन कसे करणे गरजेचे आहे.कांदा रोपांना पाण्याचे नियोजन कशा प्रकारे करावे याच्या माहितीसाठी खालील लिंक वर किंवा फोटोवर  क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे?


प्रतिबंधात्मक फवारणी नियोजन 
✅कांदा बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर अशा रोपांची मर होऊ नये म्हणून त्यावर योग्य प्रकारे फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.फवारणी खालील पैकी कोणत्याही एका किटची दाट करावी.

उपचारात्मक/नियंत्रणात्मक उपाययोजना 

✅उपचारात्मक उपाययोजना म्हणजे कांदा रोपांवर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण मिळवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय.
✅कांदा बियाणे उगवून जमिनीच्या वर आल्यानंतर अशा रोपांची मर होत असेल तर  फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.फवारणी खालील पैकी कोणत्याही एका किटची दाट स्वरूपात करावी.
✅फवारणी करताना फवारणी नौजल मधील रबर काढून दाट फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी शेतास चांगल्या प्रकारे पाणी द्यावे जेणेकरून जमिनीमध्ये असणाऱ्या ओलाव्यामुळे फवारणी द्रावण ची कार्यक्षमता वाढेल व परिणाम कमी कालावधीत चांगले मिळतील.


वरीलपैकी कोणत्याही एका किटची फवारणी केली असेल तर खालीलपैकी कोणत्याही एका किटची फवारणी करावी.