Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकत पोटॅश या अन्नद्रव्ये कमतरतेची  लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?

लक्षणे 
  • पोटॅशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होतात. आणि त्यावर तांबूस तपकिरी रंगाची जळलेली लक्षणे दिसतात.
  • पानांचा मध्यभाग गडद हिरवा राहतो पण पानांचे किडे पिवळे दिसतात.
  • झाडांची वाढ मंदावते आणि खोड पातळ आणि कमकुवत होते.
  • रोपांची फळे लहान, कठीण आणि कमी रसाळ होतात.
  • फळांवर काळे डाग दिसतात.
  • रोपांची फुले आणि फळे गळून पडतात.
कारणे 
  • मातीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असणे.
  • अत्याधिक आम्लीय मातीमध्ये पोटॅशियमची उपलब्धता कमी होते.
  • जास्त पावसामुळे मातीतील पोटॅशियम शेताबाहेर वाहून जाते.
  • रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर न केल्यामुळे पोटॅशियमची कमतरता होऊ शकते.
  • मातीचे खराब आरोग्य आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पोटॅशियमची उपलब्धता कमी होऊ शकते.
नुकसान 
  • पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या पर्णरंद्रांची उघडझाप असंतुलित होते, ज्यामुळे पानांच्या मधून पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होते. ज्यामुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होतात आणि वाढ खुंटते.
  • पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रोपांमध्ये प्रोटीन संश्लेषण प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे अन्नद्रव्य पुरवठ्यावर त्यांचा परिणाम होतो, ज्यामुळे रोपांची वाढ मंदावते.
  • पोटॅशच्या कमतरतेमुळे रोपांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • पोटॅशच्या कमतरतेमुळे फळांचा आकार व गुणवत्ता कमी होते. (गुणवत्ता- रंग आणि गोडवा)
उपाययोजना 
  • माती परीक्षण करून त्यानुसार पोटॅशियमचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.
  • MOP (म्यूरेट ऑफ पोटॅश) किंवा SOP (सल्फेट ऑफ पोटॅश) यांसारखे पोटॅशियुक्त खते वापरावीत.
  • शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर करून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व पोषण क्षमता वाढवावी.
  • मातीचे PH संतुलित ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात चुनखडी वापरावी.
  • मातीतील आद्रता टिकवण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा, ज्यामुळे पोटॅशियमची धूप कमी होईल.
  • पिकांचे नियमित निरीक्षण करून लक्षणे दिसतात त्वरित उपाययोजना करावी.

या उपायोजनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास टोमॅटो पिकात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान कमी करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल.