Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात नायट्रोजन कमतरतेची लक्षणे काय आहेत? त्यामुळे काय नुकसान होते.

लक्षणे 
  • नायट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यावर पाने  फिकट हिरवी किंवा पिवळसर रंगाची होतात पानांचा आकार लहान होतो. लक्षणे सर्वप्रथम जुन्या पानांवर दिसतात व हळूहळू नवीन पानांवर सुद्धा  दिसायला लागतात. पानांच्या शिराळा जांभळ्या रंगाच्या होतात. कालांतराने पाने  तपकिरी होतात व  गळून जातात.
कारणे 
  • जमिनीचा PH हा जास्त किंवा कमी असणे.
  • हलक्या जमिनीत नायट्रोजन कमतरता निर्माण होऊ शकते.
  • दुष्काळी परिस्थितीत अन्नद्रव्य शोषण कमी होते परिणामी नायट्रोजन कमतरता होऊ शकते.
  • अति पाऊस झाल्यामुळे जमिनीमधून जास्त प्रमाणात पाणी शेताच्या बाहेर वाहून जाते व परिणामी नायट्रोजन कमतरता भासते.
  • जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर नायट्रोजन कमतरता जाणवते.
नुकसान 
  • पाने पिवळी पडल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते किंवा कमी प्रमाणात होते परिणामी रोपांची वाढ खुंटते.
  • नायट्रोजन हे अमिनो ॲसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड संश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे नायट्रोजन कमतरतेमुळे रोपांची वाढ थांबते.
उपाययोजना 
  • जमिनीचा PH संतुलित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्यामुळे नायट्रोजन कमतरता निर्माण होणार नाही.
  • ज्या जमिनी हलक्या आहेत अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची गुणवत्ता वाढवावी.
  • दुष्काळी परिस्थितीमध्ये फवारणी नायट्रोजन युक्त खतांचा किंवा अमिनो युक्त उत्पादनांचा वापर करावा.
  • जोरात पाऊस पडून गेल्यानंतर नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा.
  • रोपांची वाढीची अवस्था लक्षात घेऊन त्यांची गरज ओळखून नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा.