Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे काय आहेत? नुकसान काय करतात व उपाययोजना काय कराव्यात.

लक्षणे
  • जुनी पाने पिवळसर होतात. परंतु त्यांच्या शिरा या गडद हिरव्या रंगाच्या  राहतात. पाने पिवळी पडताना सर्वप्रथम पानांच्या कडेच्या बाजूने पिवळी पडायला सुरु होतात. कालांतराने संपूर्ण पान पिवळे पडून गळून जाते. तसेच पाने पिवळी पडायला सुरुवात झाल्यावर पानांवर फिकट तपकिरी ठिपके येतात.. मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे ही नायट्रोजन व फेरस या अन्नद्रव्यांच्या कमतरतेशी मिळती जुळती असतात .त्यामुळे बरेच शेतकरी मॅग्नेशियम कमतरतेचे निदान करू शकत नाहीत.
कारणे 
  • ज्या जमिनीमध्ये पोटॅश , अमोनियम व कॅल्शियम या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
  • हलक्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर असते.
  • ज्या जमिनीचा PH कमी असतो अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम ची कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
  • ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
  • जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रोपांच्या मुळांच्या कक्षेतील वाहून जातो ज्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता जाणवते.
नुकसान
  • मॅग्नेशियम हे हरितकण निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी होते व रोपांची वाढ खुंटते.
  • मॅग्नेशियम कमतरतेचा थेट परिणाम पाणी शोषण करण्यावर होतो परिणामी रोपांची वाढ खुंटते.
  • मॅग्नेशियम कमतरतेमुळे फळे कमी दर्जाची होतात वजन व त्यांचा आकार कमी होतो.
  • मॅग्नेशियम कमतरतेमुळे रोपांची प्रतिकारशक्ती कमी होते ज्यामुळे किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
उपाययोजना
  • मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम नायट्रेट खतांचा वापर करावा.
  • मातीचे माती परीक्षण करून त्यामध्ये मॅग्नेशियमची प्रमाण मोजून त्यानुसार खत नियोजन करावे.
  • पाऊस पडल्यानंतर मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर फवारणी व ठिबक द्वारे करावा.
  • जमिनीचा PH संतुलित ठेवावा ज्यामुळे मॅग्नेशियमची उपलब्धता वाढेल.