कांदा बियाण्याची अंकुरण क्षमता कशी वाढवता येईल?
कांदा बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा.
बियाण्याची निवड
✅ कांदा बियाणे चांगल्या गुणवत्तेचे व वातावरणाशी जुळवून घेता येईल असे निवडावे. जेणेकरून जर बियाणे चांगल्या प्रतीचे असेल तर त्यांची उगवण क्षमता चांगली असते.
✅ बियाण्याची निवड कशा प्रकारे करावे यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून माहिती घ्यावी.
कांदा बियाणे निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?
बीजप्रक्रिया
✅ कांदा बियाण्यास जर योग्य प्रकारे बीजप्रक्रिया केली तर बियाण्याचे जमिनीत असणाऱ्या बुरशींपासून संरक्षण होते व त्यामुळे बियाण्याचे नुकसान होत नाही. त्यामुळे पेरलेले जास्तीत जास्त बियाणे उगवून येते व बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
✅ कांदा बियाण्याची बीजप्रक्रिया कशी करावी व कोणत्या उत्पादनांची करावी याची माहिती घेण्यासाठी खालील फोटोवर किंवा निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करावे.
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?
पाणी नियोजन
✅ बियाणे पेरणी केल्यानंतर मातीच्या प्रकारानुसार, जलसिंचन प्रकारानुसार व वातावरणानुसार पाणी नियोजन करावे. जर जमिनीमध्ये योग्य प्रकारे ओलावा असेल तर बियाण्याचे अंकुरण त्यात वाढते परंतु जर ओलावा जास्त किंवा कमी असेल तर अंकुरण क्षमता किंवा उगवण क्षमता कमी होते.
✅ कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे याची माहिती मिळवण्यासाठी खालील फोटोवर किंवा खालील लिंक वर क्लिक करावे.
कांदा रोपवाटिकेत पाणी नियोजन कसे करावे?