जबाबदार बुरशी   

✅ या  बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा Botryotinia Squamosa या बुरशीमुळे होतो.

लक्षणे  

✅ यामध्ये रोपांच्या पातींवर पांढऱ्या रंगाचे एकापेक्षा जास्त ठिपके दिसतात. कालांतराने या ठिपक्यांचे प्रमाण वाढते व ठिपक्यांचा आकार वाढत. कालांतराने हे ठिपके  एकमेकांत मिसळतात व मोठा डाग तयार होतो. त्यानंतर त्या  ठिकाणाहून पात पिचकते.

यामुळे नुकसान काय होते?

✅ रोपांचे शेंडे करपतात.या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पातीमधील हरितकणांचे प्रमाण कमी होते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया विस्कळीत होते.तसेच ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळे तुटते. परिणामी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारे पाणी व अन्नद्रव्य पुरवठा रोखला जातो.
✅प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून तयार झालेला अन्नसाठा सुद्धा व्यवस्थित वाढीच्या भागांना व साठवण्यासाठी पोहोचवला जात नाही. त्यामुळे रोपांची वाढ खुंटते तसेच ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पर्णरंद्रारांचे नुकसान होते व वायूबदल प्रक्रिया मंदावते व परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग कमी होतो व त्यामुळे रोपांची वाढ खुंटते.त्याचबरोबर या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बुरशीनाशक उत्पादनांचा खर्च वाढतो.

पोषक वातावरण 

✅ या बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव हा जास्त वेळ पाती ओलसर राहिल्यामुळे व तापमान 15०C ते 25०C च्या दरम्यान असल्यावर व आद्रता 80% ते 90% च्या दरम्यान असते तेव्हा मोठ्या प्रमाणावर होतो.

प्रसार 

✅ या बुरशीचा प्रसार हा एका भागातून दुसऱ्या भागात पातीवर असणारा ओलावा याद्वारे होतो.जेव्हा सतत पाऊस पडत असतो,  जास्त प्रमाणात धुके असते, तेव्हा पाती जास्त काळ ओल्या असतात. ज्यामुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रसार अधिक जलदगतीने होतो. 

उपाययोजना  

✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन न देणे व प्रसार रोखणे यासाठी एकात्मिक, प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकात्मिक उपाययोजना  

बियाणे निवड :
✅एकात्मिक नियोजनामध्ये योग्य प्रकारच्या निरोगी बियाण्यांची निवड केल्यास बोट्रीटिस करपा बरोबर इतर बुरशीजन्य रोगांवर सुद्धा नियंत्रण मिळेल.कांदा बियाणे निवड कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा बियाणे निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?


जमिनीची निवड
✅अशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी
ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होईल व जमीन लवकर कोरडी होईल.जमिनीची निवड कशा प्रकारे व कशाचा आधारावर करावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करा.
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?


शेतीची मशागत :
✅यासाठी जेव्हा शेताची मशागत करत असतो तेव्हा शेत खोलवर नांगरून घ्यावे व किमान 10 ते 15 दिवस उन्हामध्ये तापून द्यावे. ज्यामुळे जे जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशीचे बीजाणू आहेत ते  सूर्यप्रकाशामुळे निष्क्रिय होतील. तसेच त्यानंतर फणपाळी मारून जे जुन्या पिकांचे, तणांचे अवशेष काडी कचरा बाहेर येतो. तो शेताच्या बाहेर उचलून टाकावा, ज्यामुळे त्याचबरोबर बुरशीचे बिजाणू सुद्धा शेताच्या बाहेर जातील.कांदा रोपवाटीकेसाठी शेताची मशागत कशी करावी याची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर किंवा फोटो वर क्लिक करावे.
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

✅ पाणी नियोजन
जर तुम्ही तुषार सिंचन किंवा रेन पाईपद्वारे पाणी देत असाल तर पाणी हे सूर्यप्रकाश असताना द्यावे. ज्यामुळे पातीवर पाणी राहत नाही व या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखला जाईल.


✅ धुके 
ज्यावेळेस सकाळच्या वेळी धुके पडते अशा वेळी बारदान किंवा सुती कापड त्यावर फिरवून त्यावरील धुके घालवावे किंवा धुके पडल्यानंतर सूर्यप्रकाश असताना 10 मिनिटे तुषार सिंचन चालू करावे, ज्यामुळे पातीवर धुक्याचे कण राहणार नाहीत व या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.धुके पडल्यानंतर कांदा रोपांची काळजी कशी घ्यावी याची माहिती घेण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर व फोटो वर क्लिक करा.
सतत धुके पडल्यामुळे कांदा रोपांवर नर्सरीमध्ये काय अडचणी येतात व त्यावर काय उपाययोजना कराव्यात?


✅ फवारणी नियोजन 
कांदा रोपांची नर्सरी ही प्रामुख्याने ऑक्टोंबर, सप्टेंबर व नोव्हेंबर या महिन्यात केली जाते.या महिन्यात मोठ्या प्रमाणावर धुके पडते, ज्यामुळे सतत पाती ओल्या राहतात व या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होतो.त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी खालील पैकी एका किटची फवारणी करावी. 

उपचारात्मक उपाययोजना 

✅ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन फवारणी नियोजन करणे गरजेचे आहे.
वाढीच्या अवस्थानुसार फवारणी नियोजन करण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

रोप रूजन्याची अवस्था (रोप लागवड ते पहिले 10 दिवस ) 

Roko – Actara – Root Star Drenching Kit


Bavistin Karate Stopit Spray Combo Kit


Roko Stopit Karate Spray Combo Kit

रोप रूजन्याची अवस्था (रोप लागवडी नंतर 10 ते पहिले 20 दिवस ) 

Tata Master Actara RootStar Spray Kit


Tata master- Aaatank-MC Extra Spray Kit


Saaf – Admire – Root Aster Drenching Kit


Saaf Profex super MC Extra Spray Kit


Matco Gold Admire RootAster Drenching Kit


RidomilGold Marshal GreenBee Spray Kit


रोप वाढीची अवस्था (रोप लागवडी नंतर 20 दिवस ते 35 दिवस ) 

Score Kavach Alika Spray Combo Kit


Antracol Buonos Solomon Spray Combo Kit


Captaf – Contaf plus – Alika Spray Combo Kit


Captaf Contaf Plus Solomon Spray Combo Kit