Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो पिकातील अन्नद्रव्ये कमतरता

टोमॅटो पिकात बोरॉन अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते..?

लक्षणे 
  • रोपांची नवीन पाने गोळा होतात.
  • टोमॅटोच्या फळांवर काळे किंवा गडद रंगाचे डाग पडतात.
  • रोपांची फळे आणि फुले गळून पडतात.
  • रोपांची वाढ खुंटते आणि नवीन वाढ नाजूक असते.
  • रोपांच्या पानांच्या कडा कोरड्या पडतात आणि गोळा होतात.
कारणे 
  • काही जमिनीत नैसर्गिकरित्या बोरॉनचे प्रमाण हे कमी असते.
  • पाण्याची कमतरता असल्यास बोरॉनचे शोषण कमी होते.
  • जास्त प्रमाणात पाऊस पडल्यावर जमिनी मधील बोरॉन शेताच्या बाहेर वाहून नेले जाते.
  • जास्त PH असलेल्या जमिनी बोरॉनची उपलब्धता कमी असते.
  • जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास बोरॉनची कमतरता भासते.
नुकसान 
  • पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही कमी होते.
  • फळांचे लहान होतात, आणि रंग ही नीट विकसित होत नाही.
  • झाडांची सामान्य वाढ आणि विकास मंदावतो.
उपाययोजना 
  • बोरॉनयुक्त खतांचा जसे की बोरोक्स (Borox) किंवा सोल्यूबल बोरॉन फर्टिलायझर्स योग्य प्रमाणात वापर करावा. जमिनीचे नियमित परीक्षण करून बोरॉनची उपलब्धता तपासावी.
  • योग्य प्रकारे पाण्याचा वापर करून जमिनीतील ओलावा कायम ठेवावा.
  • जमिनीचा PH हा 6.5-7.5 च्या दरम्यान ठेवणे गरजेचे आहे.
  • सेंद्रिय पदार्थांचा संतुलित वापर करावा, ज्यामुळे बोरॉनची उपलब्धता कमी होत नाही.

हे सर्व उपाययोजना करून टोमॅटो पिकामध्ये बोरॉनच्या कमतरतेची समस्या सोडवता येते आणि पिकांची गुणवत्ता उत्पादन वाढवता येईल.