Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria Black Spot)

जबाबदार बुरशी 

Septoria lycoperisici

पोषक वातावरण 
  • या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणामध्ये होते. जेव्हा तापमान हे 15°C ते 27°C च्या दरम्यान असते व आर्द्रता जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
लक्षणे 
  • टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
  • पानांवर:जुन्या पानांच्या खालच्या बाजूला गडद तपकिरी आकाराने लहान गोलाकार असे ठिपके दिसतात. ज्यांची प्रभावळ पिवळी असते. कालांतराने संपूर्ण पान पिवळे पडते व गळून जाते.
  • खोडावर,फांद्यावर किंवा देठावर : खोडावर,फांद्यावर किंवा देठावर बारीक काळ्या रंगाचे ठिपके दिसायला सुरुवात होते. कालांतराने या ठिपक्यांचे रूपांतर डागांमध्ये होते व ती फांदी गळून जाते.
प्रसार 
  • या बुरशीचा प्रसार तुषार सिंचनामुळे जी माती खालच्या पानांवर उडते त्यामुळे होतो. त्याचबरोबर पावसाच्या मोठ्या थेंबामुळे जी माती रोपांच्या खालच्या पानांवर उडते तेव्हा होतो.
  •  या बुरशीला उष्ण व आर्द्रता असलेले हवामान अनुकूल असते. पावसाळ्यात आणि ओलसर हवेत रोगाचा प्रसार अधिक होतो.
  • तसेच महिला मजुरांच्याद्वारे या बुरशीजन्य रोगाचा प्रसार होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • दोन ओळी मधील अंतर हे जास्त असायला हवे जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हा जमिनीवरती पडेल व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा राहणार नाही.
  • रोपांची लागवड करताना रान वाफस्यावर असणे गरजेचे आहे, ज्यामुळे महिला कामगारांच्या हाताला जास्त चिखल लागत नाही.ज्यामुळे तो चिखल रोपांच्या पानांना किंवा खोडाला लागत नाही व या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
  • मोठा पाऊस पडल्यानंतर लगेच रोपांच्या खालच्या पानांवर असणारी माती धुऊन काढण्यासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • शेतामध्ये कोणतेही काम करून झाल्यानंतर लगेच फवारणी करावी ज्यामुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होत नाही.
उपचारात्मक उपाययोजना