Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

लवकर येणारा करपा (Early Blight)

जबाबदार बुरशी 

Alternaria solani

पोषक वातावरण 
  • या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणात होते. जेव्हा तापमान 24-29°C च्या दरम्यान असते आणि जेव्हा वातावरणामध्ये जास्त आद्रता किंवा वारंवार पाऊस पडतो, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव हा मोठया प्रमाणामध्ये होतो.
लक्षणे 

टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे ही खालील प्रमाणे आहेत.

  • पानांवर : सुरुवातीला रोपांच्या खालील पानांवर लहान, गडद व अनियमित आकाराचे डाग दिसायला सुरुवात होते. त्या डागांची प्रभावळ ही पिवळ्या रंगाची असते. असे डाग एका पानांवर एकापेक्षा जास्त असतात. कालांतराने हे डाग एकमेकात मिसळतात व संपूर्ण पान हे पिवळे पडून गळून पडते. त्यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता कमी होते.
  • देठांवर /फांदीवर : देठांवर सुरुवातीला काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे डाग दिसतात. कालांतराने हे डाग मोठे होतात व तो वनस्पतीचा भाग सुकून जातो.
  • फळांवर : फळांवर सुरुवातीला काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे डाग दिसतात. कालांतराने हे डाग एकमेकात मिसळतात आणि फळ कुजण्यास कारणीभूत ठरतात.
प्रसार 
  • रोपांच्या खालील पानांचा मातीशी संपर्क आल्यामुळे किंवा पावसामुळे खालील पानांवर माती उडल्यामुळे प्राथमिक प्रादुर्भाव होतो.
  • याचा प्रादुर्भाव पानांना पाने चिकटल्या असल्यामुळे शेजारच्या वनस्पतीला होतो.
  • शेतामध्ये शेतमजूर काम करत असताना (भांगलन, बांधणी ) यांच्यामार्फत या बुरशीच्या प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
  • पाने जास्त वेळ ओलसर राहिल्यामुळे या बुरशीचा प्रसार हा जलद गतीने होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • दोन ओळीमधील अंतर हे जास्त असायला हवं जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीवरती पडेल व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा राहणार नाही.
  • रोप लागवड करत असताना मल्चिंग पेपरचा वापर करावा, ज्यामुळे रोपांच्या थेट जमिनीशी संपर्क येणार नाही, त्यामुळे पावसामुळे जी माती खालील पानांवर उडते ती उडणार नाही.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर (भांगलन,बांधणी इ.) लगेचच स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
    शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर कोणत्याही एका स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
उपचारात्मक उपाययोजना