Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

रायझोकटोनिया रोपमर (Rhizoctonia Wilt)

जबाबदार बुरशी

Rhizoctonia solani

पोषक वातावरण 
  • जमिनीमध्ये जेव्हा जास्त ओलावा असतो, तेव्हा या बुरशीची वाढ जलद गतीने होते.
  • जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व दीर्घकाळापासून उच्च आद्रता असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे 
  • जमिनीमध्ये प्रादुर्भाव हा रोपांच्या खोडावर आणि देठावर तपकिरी रंगाच्या जखमा दिसून येतात, तसेच जेथे खोड जमिनीला चिकटलेले असते तेथे रोपे कुजण्यास सुरुवात होते.
  • कालांतराने त्याचा प्रादुर्भाव वाढून रोपांची वाढ खुंटते व रोपे कोलमडून खाली पडतात आणि रोपांची मर होते.
प्रसार
  • या बुरशीचा प्रसार पाण्याद्वारे आणि मातीमधून होतो.
  • जमीनीमधील अधिकच्या ओलाव्यामुळे या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
  • शेतमजुरांद्वारे या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • रोपांची लागवड करताना रोपांच्या खोडाला माती लागणार नाही याची काळजी घ्यावी.जेणेकरून मातीद्वारे या बुरशीचा प्रादुर्भाव रोपांच्या खोडावर होणार नाही.
  • रोपांची लागवड करताना रोपे हि चिमटीने न दाबता सपाट हाताने दाबावीत.चिमटीने दाबल्यास तिथे जखम होते व त्या जखमे मधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
  • रोप लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करावे जेणेकरून अधिकच्या ओलाव्या मधून बुरशीचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव कमी असेल तर प्रादुर्भावीत रोपे काढून टाकावीत.
  • रोप लागवड केल्यानंतर जैविक बुरशीनाशकांचा वापर आळवणी मध्ये करावा.
उपचारात्मक उपाययोजना