शास्त्रीय नाव 

Aphis gossypii

किडीचे जीवनचक्र

Aphis gossypii  या किडीचे जीवनचक्र विविध टप्प्यांमध्ये पूर्ण होते. हे जीवनचक्र समजून घेतल्याने टोमॅटो पिकाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते.

अंडी (Egg Stage)

  • हिवाळ्यात, मादी पतंग पानांच्या खालच्या बाजूस लहान आकराची व काळ्या रंगाची अंडी घालते.
  • हिवाळ्यात ही अंडी निष्क्रिय अवस्थेत राहतात.

निम्फ अवस्था (Nymph Stage)

  •  वसंत ऋतूत तापमान वाढल्यावर अंड्यांतून निम्फ(पिल्ले) बाहेर येतात.
  •   निम्फ(पिल्ले) आकाराने लहान, पिवळसर किंवा हिरवट रंगाचे असतात आणि पंखहीन असतात.
  •   निम्फ(पिल्ले) अनेक वेळा त्वचा बदलतात (मोल्टिंग) आणि प्रौढ अवस्थेत पोहोचतात.

नवयुवक (Young Aphids)

  •  निम्फ(पिल्ले) वाढून नवयुवक अवस्थेत पोहोचतात.
  •  हे नवयुवक लहान आकाराचे आणि पंखहीन असतात.
  •  रोपांच्या पानांवर रसशोषण करतात आणि रोपांच्या नवीन पानांवर,शेंडयावर कोवळ्या भागावर आढळतात.

प्रौढ अवस्था (Adult Stage)

  •  प्रौढ मावा पंखयुक्त किंवा पंखहीन असू शकतात.
  • पंखहीन  साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस आढळतात आणि आणि तिथेच रसशोषण करतात.
  •  पंखयुक्त प्रौढ पतंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडतात आणि तिथे प्रजोत्पादन करतात.

प्रजनन (Reproduction)

  • प्रौढ मादी मावा पार्थेनोजेनेसिसद्वारे (अंड्यांशिवाय नव्या अफिडचा जन्म) प्रजोत्पादन करतात.
  • या प्रक्रियेमुळे एकाच हंगामात मावा या किडीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
  • या किडीचे संपूर्ण जीवनचक्र 7 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण होते. त्यांचे जीवनचक्र कमी दिवसात पूर्ण होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव जलद गतीने होत असतो.
पोषक वातावरण 
  • टोमॅटो पिकात Aphid (मावा) किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ओळखणे आणि त्यानुसार नियंत्रणाची उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मावा किडीची संख्या वाढवणाऱ्या मुख्य वातावरणीय घटकांमध्ये तापमान,आर्द्रता आणि इतर परिस्थितींचा समावेश होतो.

उत्तम तापमान

  •    मावा किडीची संख्या 20°C-25°C तापमानात जलद वाढते.
  •    या तापमानात त्यांची प्रजनन क्षमता वाढते आणि ते लवकर वाढतात

उच्च आर्द्रता

  •    65-80% आर्द्रता मावा किडीच्या वाढीसाठी पोषक असते.
  •    जास्त आर्द्रतेमुळे त्यांची संख्या वाढते.

स्वच्छ आणि शांत वातावरण

  •    वाऱ्याचा कमी वेग आणि शांत वातावरण मावा किडीच्या वाढीसाठी अनुकूल असते.
  •    वारा नसल्यामुळे ते सहजपणे पानांवर किंवा फळांवर राहतात आणि अंडी घालतात.

पोषक रोपे 

  •    लुसलुशीत आणि कोवळ्या पानांचे असलेले टोमॅटो पिक मावा किडींना आकर्षित करते.
  •    नवीन आणि लहान पानांवर ते लवकर पसरतात.

पाणी आणि खतांचा अधिक वापर

  • अत्याधिक  पाणी आणि नायट्रोजन खतांचा वापर वनस्पतींना कोवळी आणि लुसलुशीत बनवतात, ज्यामुळे मावा किडींना अनुकूल वातावरण मिळते.
किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखवा 
  • निरीक्षण करणे : रोपांच्या पानांवर,देठांवर आणि फुलांवर छोटे,मऊ आणि बहुधा पिवळसर,हिरवट किंवा काळे किटक दिसत आहेत का ते पहा.
  • पानांवरील लक्षणे: पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात,पाने सुरकतल्या प्रमाणे होत आहेत का किंवा चुरगळत आहेत का ते पहा.
  • विकसित न होणे: किडींच्या तीव्र आक्रमणामुळे झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • नियमित निरीक्षण: नियमित पिकांची तपासणी करा, विशेषतः पाने, देठ आणि फुले यांवर निरीक्षण करा.
  • प्राकृतिक शत्रू: लेडीबर्ड बीटल्स, लेसविंग्स आणि पॅरसिटिक वॉस्प्स सारखे प्राकृतिक शत्रू किडी नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहेत त्यांचा वापर प्रभावीपणे करा.
  • सेंद्रिय उपाय: नीम तेल, साबणाचे द्रावण किंवा सेंद्रिय किटकनाशकांचा चा वापर करावा..
  • पिक फेरपालट: एकाच पिकाच्या वारंवार लागवडीमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. विविध पिकांची लागवड करा.
  • तण नियंत्रण: तण नियंत्रित ठेवा कारण तणांवरही किडी राहतात.
  • संक्रमित पिकांचे अवशेष काढून टाका आणि जाळा.
  • या उपाययोजना वापरून Aphis gossypii किडीचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवता येईल आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल.
उपचारात्मक नियंत्रण