जबाबदार बुरशी 

✅Oidium neolycopersici

पोषक वातावरण
  • जेव्हा वातावरणामध्ये आद्रता ही जास्त असते व तापमान 15°C ते 25°C च्या दरम्यान असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
  • तसेच दमट वातावरणात या बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. ही बुरशी 10°C पेक्षा कमी तापमानाला जिवंत राहू शकत नाही.
लक्षणे 
  • सर्वप्रथम खालच्या पानांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे पिठासारखे बारीक चट्टे दिसायला सुरुवात होते.पाने पिवळी पडायला सुरुवात होते.
  • कालांतराने त्याचे प्रमाण वाढते व पानांच्या वरच्या बाजूला पिठासारखा थर तयार होतो व पाने पिवळी पडून गळून जातात.
  • त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवरती होतो.
प्रसार 
  • पोषक वातावरण तयार झाल्यानंतर या बुरशीचा प्रथम प्रादुर्भाव हा रोपांच्या खालील पानांवर होतो.
  • त्यानंतर जसजसा प्रादुर्भाव वाढतो तसा या बुरशीचा प्रसार वरील पानांवर होतो.
  • महिला कामगारांच्याद्वारे या गोष्टीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो, तसेच वाऱ्यामुळे सुद्धा या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • दोन ओळींमधील अंतर हे जास्त असायला हवे, जेणेकरून खालील पानांवर सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडतो आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो.
    भुरी या बुरशीजन्य रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यावर लगेच बुरशीनाशकाची फवारणी करावी.
उपचारात्मक उपाययोजना