Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

पिथीयम रोप मर (Pythium Wilt)

जबाबदार बुरशी 

Pythium spp.

पोषक वातावरण 
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 20-30°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे 
  • प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागालगत रोपांचे खोड पाणी शोषल्यागत होते.
  • त्यानंतरच्या टप्प्यात त्या जागेवरून जमिनीवर पडते व शेवटच्या टप्प्यात अशा रोपांची संपूर्ण पाने सुकून जातात व अशा रोपांवर पांढऱ्या रंगाची किंवा राखाडी रंगाची बुरशी दिसते.
प्रसार 
  • या बुरशीचा प्रसार जमिनीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या अधिकच्या ओलाव्यामुळे होतो. (मुख्यत्वे पाण्यामार्फत होतो)
  • तसेच शेत कामगारांच्या मार्फत व त्यांच्या शेती साहित्यामार्फत या बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • ही बुरशी एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामार्फत पसरते. या बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी शेतात पाणी देताना योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • जास्त पाणी न देता गरजेनुसार रोज थोडे थोडे पाणी द्यावे.
  • रोपांची लागवड करताना रान वाफस्यावर असणे गरजेचे आहे,ज्यामुळे महिला कामगारांच्या हाताला जास्त चिखल लागत नाही व त्यांच्या मार्फत बुरशीचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होत नाही.
  • रोपांची लागवड करताना योग्य पद्धतीने रोपांची लागवड करावी. शक्यतो रोप मातीमध्ये दाबताना ते चिमटीने दाबू नये हलक्या व सपाट हाताने दाबावे, चिमटीने दाबल्यास रोपांच्या खोडाला जखमा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे या जखमेतून बुरशी आत मध्ये प्रवेश करते.
  • सुरुवातीच्या टप्प्यात नायट्रोजनचा वापर कमी करावा, नायट्रोजनच्या अतिवापरामुळे रोपांची मुळे जमिनीत खोलवर जातात परिणामी मुळांच्या टोकांना जखमा होतात व बुरशी रोपांच्या मुळांच्या जखमांमधून आत मध्ये प्रवेश करते व मोठ्या प्रमाणावर रोपमर होते.
उपचारात्मक उपाययोजना