Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो जिवाणूजन्य रोग

जिवाणूजन्य रोपमर (Bacterial Wilt)

जबाबदार जिवाणू 

Ralstonia solanacearum

पोषक वातावरण 
  • जेव्हा तापमान 25°C ते 35°C च्या दरम्यान असते व आद्रता ही जास्त असते तसेच जमिनीमध्ये ओलावा जास्त असतो तेव्हा या जिवाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
इतर पोषक परिस्थिती
  • जेव्हा जमिनीमध्ये ओलावा जास्त असतो, जमिनीचा pH हा 6 ते 7 च्या दरम्यान असतो व जमिनीमध्ये जास्त सेंद्रिय कर्ब असतो, त्या जमिनीत याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
लक्षणे
  • कोवळी पाने दिवसाच्या उच्च तापमानामध्ये मरगळतात आणि हवामान थंड पडल्यावर थोडी सावरतात.
  • प्रादुर्भाव वाढल्यानंतर पूर्ण झाडावरच मरगळ पसरते आणि कायमची राहते.
  • मरगळलेली पाने फांदीला चिटकून राहतात आणि हिरवीगार असतात.
  • मुळे आणि खोडाच्या बुडाचा भाग मात्र गडद तपकिरी रंगाचा होतो. संक्रमित मुळे दुय्यम जीवणूच्या प्रादुर्भावमुळे  कुजू लागतात.
  • रोपाचे खोड उभे चिरले तर आतून तपकिरी,राखाडी किंवा काळसर पडलेले दिसते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना 
  • दोन ओळी मधील अंतर हे योग्य असायला हवे.
  • शेतात पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या.
  • रोगांचा प्रसार रोखण्यासाठी प्रादुर्भावित रोपांना काढून टाका.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यावर योग्य बुरशीनाशकाची फवारणी करा.
उपचारात्मक उपाययोजना