काळी कुरतडणारी अळी (Black Cut Worm)
शास्त्रीय नाव
✅Agrotis ipsilon
किडीचे जीवनचक्र
✅या किडीचे जीवनचक्र हे अंडी-अळी-कोष-पतंग असे 4 टप्यात विभागलेले आहे.
अंडी अवस्था
- प्रौढ पतंग रोपांच्या पानांवर, देठांवर किंवा रोपांच्या जवळ मातीमध्ये अंडी घालतात.
- अंडी आकाराने गोलाकार व रंगाने फिकट पांढरी असतात व उबवण्यापर्यंत त्याचा रंग गडद पांढरा होतो.
- अंडी अवस्था ही 4 ते 10 दिवसांची असते. परंतु तापमान व वातावरणातील इतर घटकांमुळे हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.
अळी अवस्था
- अंडी उबवल्यानंतर अळी बाहेर येते.
- अळी ही राखाडी, काळी किंवा तपकिरी रंगाची असते,आणि तिचे डोके वेगळ्या रंगाचे असते.
- अळीचा विकास हा अनेक टप्यात विभागलेला असतो.
- अळी अवस्था पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 आठवडे एवढा वेळ लागतो.
कोष अवस्था
- अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर अळी कोषामध्ये जाते.
- कोष हे जमिनीत मातीत किंवा जुन्या पिकांच्या अवशेषांत राहतात.
- कोष सुरुवातीला रंगाने तपकिरी असतात. व कालांतराने प्रौढ होतील तसे गडद होतात.
- कोषावस्था ही 2 ते 3 आठवडे असते.
पतंग अवस्था
- हे पतंग निशाचर असतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात.
- हे कोषातुन बाहेर आल्यानंतर काही कालावधीनंतर लगेच जमिनीमध्ये अंडी घालतात.
- पतंग अवस्था ही 2 ते 3 आठवडे असते.
✅या कीडीचे संपूर्ण जीवनचक्र 4 ते 8 आठवड्यामध्ये पूर्ण होते.
पोषक वातावरण
- जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व आद्रता ही मध्यम ते जास्त असते. तेव्हा या कीडींचा प्रादुर्भाव वाढतो.
- काळी कुरतडणारी अळी या किडीचे पतंग हे निशाचर असतात. आणि जेव्हा रात्री तापमनात वाढ होते, तेव्हा यांची कार्यक्षमता व प्रजननक्षमता वाढते.
- जेव्हा कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, तेव्हा आद्रता ही मध्यम राहते, व या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
- जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा या किडीचे कोष व अळ्या वाहून जातात. व कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रादुर्भाव कसा ओळखावा
- याचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी जिथे रोप जमिनीला चिटकते त्या ठिकाणी कट केले आहे का ते पहावे.
नुकसान काय करते
- ही अळी रोप लागवड केल्यानंतर कोवळ्या रोपांचे खोड कट करते. ज्यामुळे रोपे कोलमडून जातात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
- शेत नांगरतान खोलवर नांगरावे जेणेकरून कीडींचे कोष निष्क्रिय होतील.