Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

उशीरा येणार करपा (Late Blight)

जबाबदार बुरशी 

✅Phytophthora infestans

पोषक वातावरण
  • या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणामध्ये होते.
  • जेव्हा तापमान ही 18-26 °C च्या दरम्यान असते व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
  • दीर्घकाळ ओलसर वातावरण किंवा पाऊस या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतो.
लक्षणे
  • पानांवरील ठिपके: प्रादुर्भाव पहिल्यांदा खालील पानांवर होतो.
  • पानांच्या कडा किंवा शिरांजवळ सुरुवातीला पाणीदार ठिपके दिसतात, जे नंतर तपकिरी किंवा काळे होतात.त्यांच्या कडा पिवळसर होतात.
  • पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पांढरट बुरशीचा थर दिसतो.
  • फळांवरील ठिपके: फळांवर पाण्याने भिजल्या सारखे ठिपके दिसतात, जे नंतर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे होतात. हे ठिपके फळांमध्ये खोलवर जातात आणि फळ कुजते.
  • खोडावरील ठिपके: खोडावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके दिसतात, ज्यामुळे खोड कुजते आणि वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होतो.
  • पानांचे सुकणे: रोगाच्या जास्त प्रादुर्भावा नंतर पाने वाळून गळून पडतात.
प्रसार
  • पाण्याच्या थेंबांद्वारे: पाण्याचे थेंब, पाऊस किंवा सिंचन पद्धतींमुळे बुरशीचे बीजाणू पानांवर पसरतात.
  • संक्रमित अवशेष: जमिनीत राहिलेले रोगग्रस्त वनस्पतींचे अवशेष पुढील पिकांना संसर्गित करतात.
  • संसर्गित बियाणे: संसर्गित बियाणे किंवा रोपांद्वारे रोगाचा प्रसार होऊ शकतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • दोन ओळी मधील अंतर हे जास्त असायला हवं, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर वरती पडेल व जमिनीमध्ये अधिकचा ओलावा राहणार नाही.
  • रोप लागवड करत असताना मल्चिंग पेपरचा वापर करावा, ज्यामुळे रोपांच्या थेट जमिनीशी संपर्क येणार नाही, त्यामुळे पावसामुळे जी माती खालील पानांवर उडते ती उडणार नाही.
  • शेतामध्ये कोणतेही काम केल्यानंतर (भांगलन,बांधणी इ.) लगेचच स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर कोणत्याही एका स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • पिकांची फेरपालट करणे, जेणेकरून बुरशीच्या बीजाणूंचा प्रसार कमी होईल.
उपचारात्मक उपाययोजना