Crop: टोमॅटो | Topic: टोमॅटो बुरशीजन्य रोग

अँथराकोज करपा (Anthracnose Blight)

जबाबदार बुरशी

✅Colletotrichium spp

पोषक वातावरण
  • जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 24-28°C च्या दरम्यान असते व आर्द्रता  ही 90% पेक्षा जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव होतो .वारंवार पडणारा पाऊस व दुष्काळी परिस्थिती या वातावरणात सुद्धा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे
  • या रोगाची लक्षणे पाने, फांद्या, फुलांचे दांडे, यावर आढळून येतात.
  • पानांवर राखाडी ते तांबट रंगाची अंडाकृती व अनियमित आकाराचे डाग येतात, त्या डागांच्या कडा तपकिरी लालसर व जांभळ्या रंगाच्या असतात.
  • अनुकूल वातावरणात डागांची संख्या वाढते, क्षेत्रफळ वाढते व डाग मोठे होतात, असे मोठे झालेले डाग एकमेकांत मिसळतात व पूर्ण पान गळून जाते.
  • फांद्यांवर येणारे डाग तांबट तपकिरी काळ्या रंगाचे असतात. याचे प्रमाण वाढल्यावर हे संपूर्ण खोडाला वेढतात व संपूर्ण फांदी मरगळल्यागत होते.
  • फळांवर येणारे डाग हे काळ्या रंगाचे असतात. ज्यामुळे संपूर्ण फळ खराब होऊन जाते.
प्रसार
  • ही बुरशी माती, जुन्या पिकांचे अवशेष, तणांचे अवशेष, बियाने यामध्ये आढळते.
  • या बुरशीचा प्रसार जमिनीच्या अधिकच्या ओलाव्यामुळे होतो.
  • त्याचबरोबर शेतकामगारांद्वारे किंवा शेतात असणाऱ्या अवजारांद्वारे एका भागातून दुसऱ्या भागात होत असतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • ही बुरशी एका भागातून दुसऱ्या भागात जमिनीत असणाऱ्या ओलाव्यामार्फत पसरते.
  • या बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी शेतात पाणी देताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, जास्त पाणी न देता गरजेनुसार रोज थोडे थोडे पाणी देणे आवश्यक आहे.
  • जेव्हा तापमान 25°C पेक्षा थोडे जास्त असेल तेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशक ची फवारणी करावी.
उपचारात्मक उपाययोजना