टोमॅटो बुरशीजन्य रोग
व्हर्टिसिलियम रोपमर (Verticillium Wilt)
जबाबदार बुरशी ✅Verticillium spp. पोषक वातावरण थंड ते मध्यम तापमानामधे या बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 20°C ते 27°C च्या दरम्यान असते व आर्द्रता जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. वाढीसाठी पोषक मातीचे प्रकार हलकी, वालुकामय आणि चिकणमाती या प्रकारच्या मातीत बुरशी चांगली वाढते. मातीमध्ये जास्त सेंद्रिय पदार्थ […]
Read Moreरायझोकटोनिया रोपमर (Rhizoctonia Wilt)
जबाबदार बुरशी ✅ Rhizoctonia solani पोषक वातावरण जमिनीमध्ये जेव्हा जास्त ओलावा असतो, तेव्हा या बुरशीची वाढ जलद गतीने होते. जेव्हा तापमान हे 20°C ते 30°C च्या दरम्यान असते व दीर्घकाळापासून उच्च आद्रता असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे जमिनीमध्ये प्रादुर्भाव हा रोपांच्या खोडावर आणि देठावर तपकिरी रंगाच्या जखमा दिसून येतात, तसेच […]
Read Moreपिथीयम रोप मर (Pythium Wilt)
जबाबदार बुरशी ✅Pythium spp. पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 20-30°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागालगत रोपांचे खोड पाणी शोषल्यागत होते. त्यानंतरच्या टप्प्यात त्या जागेवरून जमिनीवर पडते व शेवटच्या टप्प्यात अशा रोपांची संपूर्ण पाने सुकून जातात व अशा […]
Read Moreडिडिमेला बुरशी (Didymella)
जबाबदार बुरशी ✅Didymella lycopersici पोषक वातावरण उच्च आद्रता आणि वारंवारचा पाऊस अशा वातावरणात या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 20°C – 25°C च्या दरम्यान असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे पानांवरील लक्षणे : पानांच्या कडांवर काळे ठिपके किंवा वर्तुळाकार काळपट डाग दिसतात व पानांच्या शिरांवर आणि मध्यशिरांवर काळे वर्तुळाकार डाग […]
Read Moreभुरी (Powdery Mildew)
जबाबदार बुरशी ✅Oidium neolycopersici पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये आद्रता ही जास्त असते व तापमान 15°C ते 25°C च्या दरम्यान असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तसेच दमट वातावरणात या बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. ही बुरशी 10°C पेक्षा कमी तापमानाला जिवंत राहू शकत नाही. लक्षणे सर्वप्रथम खालच्या पानांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे पिठासारखे बारीक […]
Read Moreडाऊनी (Downey Mildew)
जबाबदार बुरशी ✅Peronospora sparsa पोषक वातावरण थंड व सौम्य वातावरणामध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. जेव्हा वातावरणामध्ये तापमान 15°C ते 22°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 85% पेक्षा जास्त असते तेव्हा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते. पानांवर जास्त काळ ओलसरता राहिल्यास बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. लक्षणे याची सर्वप्रथम लक्षणे ही रोपांच्या […]
Read Moreउशीरा येणार करपा (Late Blight)
जबाबदार बुरशी ✅Phytophthora infestans पोषक वातावरण या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणामध्ये होते. जेव्हा तापमान ही 18-26 °C च्या दरम्यान असते व आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. दीर्घकाळ ओलसर वातावरण किंवा पाऊस या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतो. लक्षणे पानांवरील ठिपके: प्रादुर्भाव पहिल्यांदा खालील पानांवर होतो. पानांच्या […]
Read Moreटोमॅटो लीफ मोल्ड (Tomato Leaf Mold)
जबाबदार बुरशी ✅Passalora Fulva पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 22°C ते 25°C च्या दरम्यान असते व वातावरणामध्ये आद्रता ही 85% पेक्षा जास्त असते. तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जास्त किंवा कमी तापमानात बुरशीचा विकास मंदावतो. तसेच जेव्हा दाट लागवड केलेली असते आणि वातावरणामधील आद्रता ही जास्त असते, तेव्हा या बुरशीची वाढ जलद […]
Read Moreसेप्टोरिया काळे ठिपके (Septoria Black Spot)
जबाबदार बुरशी ✅Septoria lycoperisici पोषक वातावरण या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणामध्ये होते. जेव्हा तापमान हे 15°C ते 27°C च्या दरम्यान असते व आर्द्रता जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. लक्षणे टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत. पानांवर:जुन्या पानांच्या खालच्या बाजूला गडद तपकिरी आकाराने लहान गोलाकार असे ठिपके […]
Read Moreअँथराकोज करपा (Anthracnose Blight)
जबाबदार बुरशी ✅Colletotrichium spp पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 24-28°C च्या दरम्यान असते व आर्द्रता ही 90% पेक्षा जास्त असते तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव होतो .वारंवार पडणारा पाऊस व दुष्काळी परिस्थिती या वातावरणात सुद्धा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे या रोगाची लक्षणे पाने, फांद्या, फुलांचे दांडे, यावर आढळून येतात. पानांवर राखाडी ते […]
Read Moreफुजारियम रोपमर (Fusarium Wilt)
जबाबदार बुरशी ✅Fusarium oxysporum पोषक वातावरण वातावरणामध्ये तापमान हे 24°C ते 28°C च्या दरम्यान असते व आद्रता 80% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हा हवामान हे उबदार व दमट असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव जलद गतीने होतो. लक्षणे या बुरशीचा प्रथम प्रादुर्भाव हा जिथे खोड जमिनीला चिकटलेले असते तिथे होतो. […]
Read Moreफायटोपथोरा रोपमर (Phytophthora Wilt)
जबाबदार बुरशी ✅ Phytophthora capsici पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 25 – 30°C च्या दरम्यान असते व उच्च आद्रता असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने होतो. लक्षणे सर्वात लक्षणीय लक्षण म्हणजे रोपे अचानक कोमजून जातात. विशेषत: उष्ण हवामानात रोपांचे खोड जेथे जमिनीला चिकटलेले असते तेथे गडद पाण्याने भिजलेले घाव दिसतात. […]
Read Moreस्टेमफिलियम राखाडी ठिपके (Stemphyllium Spot)
जबाबदार बुरशी ✅Stemphyllium solani पोषक वातावरण जेव्हा तापमान हे 20°-30°C च्या दरम्यान असते व आद्रता ही 80% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत. पानांवर : या बुरशीजन्य रोगाची लक्षणे वनस्पतींच्या सर्व पानांवर दिसायला सुरुवात होते. ज्यामध्ये पानांवर तांबट रंगाचे ठळक ठिपके […]
Read Moreटोमॅटो ग्रे मोल्ड (Tomato Gray Mold)
जबाबदार बुरशी ✅Botrytis Cinerea पोषक वातावरण जेव्हा वातावरणामध्ये तापमान हे 15 ते 25°C च्या दरम्यान असते व वातावरणामधील आद्रता ही 90% पेक्षा जास्त असते, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लक्षणे पानांवरील ठिपके: पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसू लागतात. हे ठिपके नंतर तपकिरी किंवा करडया रंगाचे होतात. फुलांवरील लक्षणे: फुले करडी व काळपट होतात […]
Read Moreलवकर येणारा करपा (Early Blight)
जबाबदार बुरशी ✅ Alternaria solani पोषक वातावरण या बुरशीची वाढ उबदार व ओल्या वातावरणात होते. जेव्हा तापमान 24-29°C च्या दरम्यान असते आणि जेव्हा वातावरणामध्ये जास्त आद्रता किंवा वारंवार पाऊस पडतो, तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव हा मोठया प्रमाणामध्ये होतो. लक्षणे टोमॅटो पिकात या बुरशीजन्य रोगाची लक्षणे ही खालील प्रमाणे आहेत. पानांवर : सुरुवातीला रोपांच्या खालील पानांवर […]
Read More