1.कांदा बियाणे पेरणीपूर्वीचे नियोजन
कांदा बियाण्याची अंकुरण क्षमता कशी वाढवता येईल?
कांदा बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा. बियाण्याची निवड कांदा बियाणे चांगल्या गुणवत्तेचे व वातावरणाशी जुळवून घेता येईल असे निवडावे. जेणेकरून जर बियाणे चांगल्या प्रतीचे असेल तर त्यांची उगवण क्षमता चांगली असते.
बियाण्याची निवड कशा प्रकारे करावे यासाठी खालील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून माहिती घ्यावी. कांदा बियाणे निवड करताना […]
कांदा बी टाकण्याची पद्धती
कांदा बी टाकण्याची पद्धत कांदा बी टाकण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारची म्हणजेच गादीवाफा पद्धत किंवा सारा पद्धत यापैकी कोणत्या प्रकारे रोपवाटिका तयार करत आहात त्यावर ते अवलंबून आहे. काही प्रमुख पद्धती
पेरणी पद्धत
फेकून देणे (विस्कटने पद्धत)
टोकन पद्धत पेरणी पद्धत
या पद्धतीमध्ये पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते, ज्यामुळे एकसारखे अंतर […]
कांदा रोपवाटिकेचे प्रकार
कांदा रोपवाटिका प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते. सारा पद्धत
गादीवाफा पद्धत सारा पद्धत
या पद्धतीमध्ये चार फुटी सारे सोडले जातात व त्यामध्ये बियाणे पेरणी केले जाते किंवा टाकले जाते. या पद्धतीमध्ये बियाण्यास पाणी हे सोड पाणी पद्धत, तुषार सिंचन पद्धत याद्वारे दिली जाते. या प्रकारात एक एकर रोपांसाठी जर रोपवाटिका बनवत असाल तर रोपवाटिका ही […]
कांदा रोपवाटिकेसाठी कशा प्रकारच्या जमिनीची निवड करावी?
कांदा रोपवाटिकेसाठी जमिनीची निवड करताना खालील गोष्टींचा विचार करावा. प्रामुख्याने माती ही गाळाची माती, काळी माती, तांबट माती, काळी-तांबट माती, मुरमाड व वाळूसार माती यापैकी आपण गाळाची माती,मुरमाड माती व वाळूसार मातीमध्ये कांदा रोपवाटिका बनवू नये. रोपवाटिकेसाठी काळी माती तांबट माती किंवा तांबट काळी मिक्स माती असणाऱ्या जमिनीची निवड करावी.
जमिनीमध्ये चुनखडी किंवा जास्त खडे […]
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी?
कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीची मशागत योग्य प्रकारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची मशागत खालील प्रमाणे करावी. सर्वप्रथम जमिनीची खोलवर नांगरट करावी व जमीन उन्हामध्ये किमान सात दिवस तापून द्यावी, ज्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या हानीकारक बुरशींचे बीजाणू निष्क्रिय होतील व त्यामुळे बियाणे टाकल्यानंतर बियाण्यावर कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.
त्यानंतर शेतामध्ये फणपाळी मारावी,फणपाळी मारल्यामुळे शेतामध्ये […]
उन्हाळी कांदा बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कोणत्या उत्पादनांची बीजप्रक्रिया करावी व ती कशाप्रकारे करावी?
कांदा बीज प्रक्रिया या विषयाची माहिती घेण्यासाठी खालील विषयांवर माहिती घेणे गरजेचे आहे. कांदा बीजप्रक्रिया कशासाठी करावी? कांदा बीजप्रक्रिया करण्याचा प्रमुख उद्देश हा जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यावर होऊ नये व बियाणे उगवण्या अगोदर किंवा उगवत असताना खराब होऊ नये यासाठी करायची आहे. तसेच जर बियाण्यास बीजप्रक्रिया केली तर बियाण्याची उगवण क्षमता वाढते व […]
उन्हाळी कांद्याची एक एकर मध्ये लागवड करण्यासाठी किती क्षेत्रावर नर्सरी बनवावी व एकरी किती किलो बियाण्याची कांदा रोपे तयार करावीत?
रब्बी हंगामात कांदा लागवड करताना सारा पद्धत,गादीवाफा पद्धत,सरी पद्धत या प्रकारे केली जाते.परंतु प्रामुख्याने मुख्य पीक म्हणून कांदा लागवड केली जात असेल तर सारा पद्धत किंवा गादीवाफा पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असतात.
एक एकर क्षेत्रामध्ये 40 गुंठे म्हणजेच 43 हजार 560 स्क्वेअर फुट असतात,यामध्ये जेव्हा या पद्धतीद्वारे कांदा लागवड केली जाते तेव्हा सरासरी […]
कांदा बियाणे निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?
कांदा बियाणे निवड करताना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. बियाण्याची गुणवत्ता बियाणे सर्टिफाइड आणि प्रमाणित असावे, खराब किंवा जुनी बियाणे वापरल्यास अंकुरणाचा दर कमी होऊ शकतो. उत्पादन क्षमता उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जातींची निवड करावी. स्थानिक हवामान, मातीचा प्रकार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य जाती निवडाव्यात. अंकुरण दर बियाण्याचा अंकुरण दर चांगला असावा. साधारणपणे 80% […]
Read More