सेंद्रिय खतांचा वापर करून माहिती गुणवत्ता कशी वाढवावी?

May 27, 2024

सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची गुणवत्ता वाढवण्याचे अनेक फायदे आहेत. सेंद्रिय खतांमध्ये पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. आणि ते मातीची सुपीकता वाढवतात. खालीलप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची गुणवत्ता कशी वाढवावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

कंपोस्ट खत 
  • कंपोस्ट खत म्हणजे जैविक कचऱ्याचे विघटन होऊन तयार झालेले सेंद्रिय खत. कंपोस्ट खत मातीला पोषक तत्वे पुरवते आणि तिची संरचना सुधारते.

कंपोस्ट तयार करणे

  • घरगुती कचरा,शेणखत,गवत,पालापाचोळा आणि स्वयंकपाक घरातील उरलेले पदार्थ एकत्र करून कंपोस्ट तयार करता येते.

फायदे 

मातीतील पोषक तत्ववांची वाढ

  • कंपोस्ट मध्ये विविध प्रकारची पोषक तत्वे असतात. ज्यात नायट्रोजन (N), फॉस्फरस आणि पोटॅशियम (K) याचा समावेश असतो. या तत्वांमुळे मातीची पोषण क्षमता वाढते.
  • तसेच कंपोस्ट मध्ये सुक्ष्म पोषक तत्वे (जसे कि झिंक, मॅग्नेशियम, तांबे) असतात. जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

मातीची संरचना सुधारते

  • कंपोस्ट खतांच्या वापरामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • मातीचे कण एकत्र बांधले जातात, त्यामुळे मातीचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. आणि मुळांच्या वाढीसाठी आदर्श वातावरण तयार होते.

मातीतील जैविक क्रियाशीलता वाढते

  • कंपोस्ट खतांमध्ये असलेले सूक्ष्मजीव मातीतील जैविक क्रियाशीलता वाढवतात.
  • सूक्ष्मजीवांच्या उपस्थितीमुळे मातीचे आरोग्य सुधारते. आणि पिकांची प्रतिकारशक्ती वाढते.

मातीचा PH संतुलित रहातो

  • कंपोस्ट मातीचा PH स्थराला संतुलित ठेवतो, ज्यामुळे माती अत्यंत आम्लीय किंवा अत्यंत क्षारीय होत नाही.
  • संतुलित pH स्थरामुळे पोषक तत्व मुळांपर्यंत सहज पोहचतात.

 पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते 

  • कंपोस्टच्या वापरामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्यामुळे मातीतील आद्रता टिकून रहाते.
  • यामुळे पिकांना आवश्यक पाणी नियमितपणे मिळते, ज्यामुळे पाण्याचा वापर कार्यक्षमतेने होतो.

रासायनिक खतांचा वापर कमी होतो 

  • कंपोस्टच्या वापरामुळे रासायनिक खताचा वापर कमी होतो, ज्यामुळे मातीचे पर्यावरणीय संतुलन राखले जाते.
  • नैसर्गिक पोषक तत्वांच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता आणि पिकांची गुणवत्ता सुधारते.

मातीची धूप कमी होते 

  • कंपोस्टच्या वापरामुळे मातीची धरपकड क्षमता वाढते, ज्यामुळे मातीची धूप कमी होते.
  • मातीचे कण बांधले जातात, ज्यामुळे मातीची संरचना टिकून रहाते.

पर्यावरणपुरक आणि टिकाऊ शेती 

  • कंपोस्ट खत नेसर्गिक आणि पर्यावरणपुरक असते, ज्यामुळे टिकाऊ शेतीसाठी आदर्श आहे.
  • कंपोस्टच्या वापरामुळे जैविक कचऱ्याचा पूर्ण वापर होतो, ज्यामुळे कचऱ्याची समस्या कमी होते.

अशा प्रकारे कंपोस्ट खतांच्या मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापर हे एक उत्तम पाऊल आहे. यामुळे मातीतील पोषक तत्वे वाढतात. मातीची संरचना सुधारते, जलसंधारण क्षमता वाढते. आणि पर्यावरणपुरक शेतीसाठी मदत होते. कंपोस्ट खतांच्या नियमित वापराने आपण आपल्या शेतीला अधिक उत्पादनक्षम टिकाऊ आणि पर्यावणास अनुकूल बनवू शकतो.

हिरवळीचे खत (Green Manure) 

हिरवळी खत म्हणजे हिरव्या वनस्पतींचे विघटन होऊन तयार झालेले खत यासाठी सस्यफण (sesbania), सनई (sanhemp),ग्वार इ. वनस्पतींचा वापर केला जातो. हिरवळीच्या वनस्पतींची पेरणी करून ती फुलांच्या अवस्थेत असताना मातीमध्ये मिसळावी.

हिरवळी खताचे फायदे 

हिरवळीच्या खताचा वापर मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक फायदे देतो, ते खालीलप्रमाणे:

सेंद्रिय पदार्थांची वाढ 

  • हिरवळीच्या खताने मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ होते. ज्यामुळे मातीचा ठिसुळपणा कमी होतो. आणि मातीची पोषणक्षमता वाढते.

मातीची संरचना सुधार

  •  हिरवळीच्या खताचे अवशेष मातीमध्ये मिसळले जातात, ज्यामुळे मातीची ढासळ होणे टाळले जाते. आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

नत्र (नायट्रोजन) पुरवठा 

  • काही हिरवळीच्या खतामध्ये नायट्रोजन साठून ठेवण्याची क्षमता असते. जसे कि हरभरा,मका,सोयाबीन इ. हे पिके मातीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे नायट्रोजनयुक्त खतांची आवश्यकता कमी असते.

मातीतील सूक्ष्मजीवांची वाढ 

  • हिरवळीच्या खतामध्ये मातीतील सूक्ष्मजीवांची विविध आणि संख्या वाढते. हे सूक्ष्मजीव मातीची पोषकता आणि आरोग्य सुधारते.

गवताची नियंत्रणे 

  • हिरवळीच्या खतांची पिके गवताची वाढ रोखतात, ज्यामुळे तण नियंत्रण सुलभ होते.

मातीचा क्षारपणा कमी करणे 

  • काही हिरवळच्या पिकांमध्ये मातीच्या क्षारपणा कमी करण्याचे क्षमता असते, ज्यामुळे मातीचा PH पातळी संतुलित राहते.

पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते

  • हिरवळीच्या खतांचे अवशेष मातीमध्ये मिसळल्यामुळे मातीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, यामुळे सिंचनाची गरज कमी होते.

मातीमध्ये हवा खेळती राहते

  • हिरवळीच्या खतामुळे मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ होते, ज्यामुळे मातीचे हवेचे स्फूटन सुधारते.

हे सर्व फायदे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा नियमित वापर आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेणखत  

शेणखत म्हणजे जनावरांच्या शेणाच्या विघटन होऊन तयार झालेले सेंद्रिय खत. हे खत पोषक तत्वांनी समृद्ध असते. आणि मातीची गुणवत्ता वाढवते.

शेण खताचा वापर 

  • शेणखत जमिनीत मिसळावे किंवा पिकांच्या मुळांजवळ वापरावे.

शेणखतांचे फायदे 

शेणखतांचा वापर मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. त्यातील काही महत्त्वाचे फायदे ते खालील प्रमाणे:

सेंद्रिय पदार्थांची वाढ

  •  शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात, जे मातीच्या संरचनेत सुधारणा आणतात. आणि मातीला सुगंधी बनवतात.

मातीची उर्वशक क्षमता वाढवणे

  • शेणखत मातीमध्ये आवश्यक पोषक तत्वांची वाढ होते, जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन वाढते.

मातीतील जिवाणू आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणे –

  • शेणखतामध्ये असलेले अनेक सूक्ष्मजीव आणि जिवाणू मातीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे मातीतील पोषक तत्वांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतात.

मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते

  •  शेणखतामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्यामुळे माती अधिक ओलसर राहते. आणि मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

मातीमध्ये हवा खेळती राहते

  • शेणखतामुळे मातीचा ढिसाळपणा कमी होतो, आणि मुळांची वाढ सुलभ होते.

मातीचा PH स्थर संतुलित राहतो

  •  शेणखतामुळे मातीच्या PH पातळीमध्ये सुधारणा होते. ज्यामुळे मातीची आम्लता किंवा क्षारपणा संतुलित राहतो.

रासायनिक खते आणि किटकनाशकांची आवश्यकता कमी करते

  •  शेणखताच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या आणि किटकनाशकांची आवश्यकता कमी होते, यामुळे पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो.

मातीतील सूक्ष्म पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवते

  • शेणखतामुळे मातीमध्ये सूक्ष्म पोषक तत्वांची उपलब्धता वाढते. ज्यामुळे पिकांच्या आरोग्यावर चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो.

कर्ब साठवण

  •  शेणखतामुळे मातीमध्ये कर्ब साठवला जातो. ज्यामुळे मातीचा रंग गडद होतो. आणि तापमान नियंत्रित राहते.

शेणखताचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केल्यास मातीची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली जाऊ शकते. आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरते.

 गांडूळखत 

गांडूळ खत म्हणजे गांडूळ वापरून तयार केलेले सेंद्रिय खत. हे खत उच्च पोषक तत्वांनी भरलेले असते.गांडूळ जैविक कचरा आणि शेणखत वापरून गांडूळ खत तयार करण्यात येते.

गांडूळ खताचे फायदे  

गांडूळ खत ज्याला वर्मीकंपोस्ट ही म्हणतात, मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत ते खालील प्रमाणे:

सेंद्रिय पदार्थांची वाढ

  • गांडूळ खतामध्ये सेंद्रिय पदार्थांचे मात्रा जास्त असते. ज्यामुळे मातीची रचना सुधारते आणि पोषणद्रव्यांची उपलब्धता वाढते.

मातीचा पोत सुधारतो

  •  गांडूळ खतामुळे मातीचा कणांचा आकार आणि बांधणी सुधारते, ज्यामुळे माती मोकळी होते आणि त्यात पाणी भरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पोषक तत्वांची उपलब्धता

  •  गांडूळ खतामुळे मातीमध्ये असलेले पोषक तत्वे वनस्पतींना सुलभपणे मिसळतात. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स यांचा समावेश आहे.

पाणी धरून ठेवण्याची क्षमता 

  • गांडूळ खत मातीमध्ये मिसळल्यावर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे वनस्पतीला अधिक वेळापर्यंत ओलावा मिळतो.

पुनरुत्पादन शक्ती

  •  गांडूळ खतामुळे मातीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे मातीची पुनरुत्पादन शक्ती वाढते. आणि वनस्पतींच्या मुळांना लागणारे पोषक तत्व मिळतात.

रोग प्रतिकारकता

  •  गांडूळ खतामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे पिकांवर होणारे रोग कमी होतात.

पर्यावरणपूरक

  • गांडूळ खत हे एक पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक खत आहे. ज्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो.

अशाप्रकारे गांडूळ खताच्या वापराने मातीची गुणवत्ता वाढते, आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.