वनस्पतींची श्वसन प्रक्रिया

May 27, 2024

वनस्पतींची श्वसन प्रक्रियेला (Respiration) “सेल्युलर रेस्पिरेशन” असे म्हणतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पेशीमध्ये घडते, आणि तिचा मुख्य उद्देश अन्नद्रव्यापासून ऊर्जा मिळवणे हा असतो. ही ऊर्जा विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक असते.

श्वसन प्रक्रियेचे टप्पे 

ग्लायकोलिसिस (Glycolysis)

  • ही प्रक्रिया कोशिकेच्या सायटोप्लाजमध्ये घडते.
  • ग्लायकोलिसिसमध्ये एक ग्लुकोज (साखर) अणूचे विभाजन होऊन दोन पायरुवेट (Pyruvate) अणू तयार होतात.
  • या प्रक्रियेत दोन एटीपी (ATP) अणू आणि NADH तयार होतात.

क्रेब्स सायकल (Krebs Cycle) किंवा सिट्रिक एडिस सायकल 

  • ही प्रक्रिया पेशींच्या मायटोकॉन्ड्रीया (Mitochondria) मध्ये घडते.
  • पायरूवेट चे रूपांतर अँसीटायल कोए (Acetyl -CoA) मध्ये होते. जे क्रेब्स सायकल मध्ये प्रवेश करते.
  • या सायकलमध्ये कार्बन डायऑक्साइड DADH,FADHZ  आणि ATP तयार होतात.

इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन (Electron Transport chain)

  • ही प्रक्रिया मायटोकॉन्ड्रीया यांच्या अंतर्गत झिल्लीवर( cinner Membrane) घडते.
  • DADH आणि FADHZ मधील उच्च ऊर्जा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये सोडले जाते.
  • या प्रक्रियेत ऑक्सिजनचा वापर होऊन पाणी तयार होते. आणि मोठ्या प्रमाणात ATP निर्मिती होते.

श्वसन प्रक्रिया 

  • ग्लुकोज + ऑक्सिजन > कार्बनडायऑक्साइड + पाणी + ऊर्जा (CATP) या प्रक्रियेत वनस्पती ग्लुकोजचा वापर करून ऊर्जा (ATP) तयार करतात. आणि हे ATP वनस्पतींच्या विविध जैविक क्रियांसाठी वापरले जाते.
श्वसन प्रक्रियेचे महत्त्व 

ऊर्जानिर्मिती

  • श्वसन प्रक्रियेत तयार झालेले ATP हे ऊर्जा स्त्रोत असते. हि ऊर्जा वनस्पतींच्या वाढीसाठी, पिकांसाठी आणि विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक असते.

विषारी पदार्थांचे निर्मूलन

  • श्वसन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साड आणि पाणी तयार होते. जे उपपदार्थ विषारी नसतात आणि ते वनस्पतींपासून बाहेर फेकले जाते.

कोशिका कार्यक्षमता 

  • ATP ची उपलब्धता कोशिकेच्या सर्व क्रियांसाठी महत्त्वाची असते. यामुळे कोशिकांची कार्यक्षमता वाढते.

प्रकाशसंश्लेषण पूरक 

  • श्वसन आणि प्रकाशसंश्लेषण या परस्पर पूरक प्रक्रिया आहेत. प्रकाससंश्लेषणाद्वारे तयार झालेली साखर श्वसनाद्वारे उर्जेत रूपांतरित होते.
  • श्वसन हि वनस्पतींसाठी आवश्यक प्रक्रिया आहे जी त्यांच्या वाढीसाठी आणि सामान्य कार्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते.