पिक फेरपालट (Crop rotation) करण्याचे फायदे आणि अंमलबजावणी टिप्स

May 31, 2024
पिक फेरपालट म्हणजे काय?

पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते. या पिक फेरपालट पद्धतीचा उद्देश जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, तण आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि शेतीचे एकूण आरोग्य सुधारणे हा आहे.

पिक फेरपालट करण्याचे फायदे 

पिक फेरपालट हि शेतीत एक महत्वाची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात ते खालीलप्रमाणे आहेत.

जमिनीची सुपीकता राखणे 

  • पिक फेरपालटीमुळे मातीतील पोषक तत्वांचा समतोल राखला जातो.
  • विविध पिकांमध्ये वेगवेगळ्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे एकाच प्रकारचे पोषक तत्व कमी होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते.

तण नियंत्रण 

  • सतत एकाच प्रकारचे पिक पेरल्याने किंवा लागवड केल्यामुळे तणांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
  • विविध पिकांच्या फेरपालटामुळे तणांची वाढ कमी होते, आणि तण नियंत्रण सुलभ होते.

रोग आणि किड नियंत्रण 

  • पिक फेरपालटामुळे जमिनीतील विशिष्ट बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • सतत एकाच पिकांच्या लागवडीमुळे किंवा पेरणीमुळे बुरशीचे बीजांणु व किडींचे कोष जमिनीत राहतात, व त्यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो, परंतु पिक फेरपालटामुळे त्यांची वाढ थांबते व रोगांवर आणि किडींवर नियंत्रण मिळते.

मातीची रचना सुधारते 

  • काही पिके जसे की डाळिंब वर्गीय पिके मातीला नायट्रोजन पुरवतात, त्यामुळे मातीची रचना सुधारते आणि जमिनीची सुपीकता वाढते.

 जैविक विविधता वाढवणे

  • पीक फेरपालटामुळे शेतातील जैविक विविधता वाढते.
  • विविध पिके पेरल्याने किंवा लागवड केल्याने शेतात विविध प्रकारचे वनस्पती, किटक आणि सूक्ष्मजीव वाढतात, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

पाणी व्यवस्थापन 

  • विविध पिकांची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते.
  • ती फेरपालटामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येतो आणि पाण्याची बचत होते.

उत्पादनात वाढ 

  • पिक फेरपालटामुळे जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारते. त्यामुळे शेवटी उत्पादन वाढते.
  • विविध पोषक तत्त्वांचा समतोल आणि तण व रोग नियंत्रणामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

दीर्घकालीन शाश्वता 

  • पिके फेरपालट हा एक शाश्वत शेतीचा भाग आहे. यामुळे जमिनीची गुणवत्ता दीर्घकालीन टिकून राहते.
  • शेतकरी दीर्घकाळासाठी चांगले उत्पन्न मिळू शकतात.

 पर्यावरण संरक्षण 

  • पीक फेरपालटामुळे रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर कमी होतो, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. जैविक पद्धतीचा वापर करून पर्यावरणास अनुकूल शेती करता येते.
  • पिक फेरपालटाच्या या सर्व फायद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. जमिनीची गुणवत्ता टिकून ठेवता येते. आणि शेती अधिक शाश्वत बनते.


पिक फेरपालटाची अंमलबजावणी कशी करावी?

पिकांची निवड 

  • आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार योग्य पिकांची निवड करावी.
  • उदा. डाळिंब, तृणधान्ये आणि भाजीपाला यांचे फेरपालट करावे.

पिकांचे गट तयार करावेत

  • समान प्रकारच्या पोषक तत्त्वांची गरज असलेल्या पिकांचे गट तयार करावेत.
  • उदा. मका, आणि ज्वारी हा एक गट, तर हरभरा, मूग आणि उडीद हा दुसरा गट

जमिनीची काळजी घ्या 

  • फेरपालट करताना जमिनीची नियमित तपासणी करा आणि आवश्यक ते बदल करा.
  • उदा. पिके (फेरपालट योजना)

फेरपालट क्रम ठरवावा 

  • ठराविक काळानंतर पिकांचे फेरपालट करण्याचा क्रम ठरवावा.
  • उदा. पहिल्या हंगामात तृणधान्ये, दुसऱ्या हंगामात डाळिंब आणि तिसऱ्या हंगामात भाजीपाला.

पहिला हंगाम : मका

दुसरा हंगाम : मुग

तिसरा हंगाम : गहू

चौथा हंगाम : हरभरा


फेरपालट अंमलबजावणीसाठी टिप्स 

विकसित नियोजन

  • पिकांचे वेळापत्रक आणि फेरपालटाचे नियोजन अगोदरच तयार करावे.

पीक माहिती

  • मागील हंगामातील पिकांच्या वाढीची आणि उत्पादनाची माहिती संचित ठेवावी.

सल्लामसलत

  • कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.

पीक फेरपालट ही एक प्रभावी पद्धत आहे. जी शेतीमध्ये उत्पादन क्षमतेत वाढ आणि पर्यावरणीय शाश्वता आणते. याचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांना दीर्घकाळापर्यंत फायदे मिळू शकतात.