पावसाळी शेती टिप्स

May 27, 2024

पावसाळी शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत. या टिप्सचा उपयोग करून शेतकरी पावसाळी शेती अधिक यशस्वीपणे करू शकतात. खालीलप्रमाणे पवासाळी शेतीसाठी टिप्स दिल्या आहेत.

योग्य पिक निवड 
  • हवामान आणि मातीचा विचार  आपल्या क्षेत्रातील हवामान आणि मातीचा प्रकार लक्षात घेऊन पिक निवडणे महत्वाचे आहे. उदा. तांदूळ,सोयाबीन,मका,ज्वारी,बाजरी,उडीद,मुग,तुर यांसारखी पिके पावसाळी हंगामासाठी योग्य असतात.
  • स्थानिक आणि प्रमाणित बियाणे   स्थानिक हवामानाला अनुरूप आणि प्रमाणित बियाणे वापरणे योग्य ठरते. यामुळे पिकांचे उत्पादन वाढते, आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
मृदासंवर्धन आणि जलसंधारण 
  • जलसंधारण तंत्रे  साखळी नाले,पाणलोट,विकास,गॅबियन बांध,वनीकरण,गवताची लागवड यांसारख्या जलसंधारण तंत्राचा वापर करावा. यामुळे पावसाचे पाणी साठून ठेवता येते.
  • सेंद्रिय खते   मातीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते वापरावीत. कंपोस्ट,हरळी,खत,गायीचे शेण यांचा वापर करून मातीतील पोषक तत्वे वाढवता येतात.
पिक व्यवस्थापन 
  • आंतरपिके   दोन किंवा अधिक पिकांची एकत्रित लागवड करून पिक उत्पादन वाढवता येते. उदा. मकयासोबत तूर किंवा मुग पिकाची लागवड करावी.
  • फळबाग आणि झाडे   पावसाळ्यात फळबागांची लागवड करणे फायदेशीर ठरते. यासाठी आंबा,पेरू,पपई,लिंबू यांसारख्या झाडांची निवड करावी.
किड आणि रोग व्यवस्थापन 
  • जैविक किटकनाशके  रासायनिक किटकनाशकांच्या ऐवजी जैविक किटकनाशकांचा वापर करावा. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. आणि मातीची गुणवत्ता कायम रहाते.
 योग्य पेरणी वेळ 
  • पेरणी वेळ  पेरणीसाठी योग्य वेळ महत्वाची आहे. उशिरा पेरणी केल्यास पिकांची वाढ कमी होते, आणि उत्पादनात घट होते.
पिक काढणी आणि नंतरचे व्यवस्थापन 
  • योग्य काढणी पिक  पिक योग्य वेळी काढणे आवश्यक आहे. उशिरा काढणी केल्यास उत्पादनांची गुणवत्ता कमी होते.
  • साठवणूक आणि विक्री  पिकांची योग्य साठवणूक आणि विक्री नियोजन करून आर्थिक फायदा मिळवता येतो.
  • वरील टिप्सचा वापर करून पावसाळी शेती अधिक यशस्वीपणे करता येईल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल.