बुरशीनाशकांचे प्रकार आणि वापरण्याची पद्धत
बुरशीनाशक (fungicide) म्हणजे असे रसायन किंवा पदार्थ जे बुरशीचा नाश करतात. किंवा त्यांच्या वाढीला प्रतिबंध करतात. बुरशीनाशकांचा वापर विविध पिकांच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
बुरशीनाशकाचे प्रकार
स्पर्शजन्य बुरशीनाशक (Contact Fungicides)
- हे फवारणी नंतर पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व पानांवर एक रासायनिक थर तयार करते आणि जेव्हा बुरशीचे बिजाणू या बुरशीनाशकच्या संपर्कात येतात तेव्हा ते निष्क्रिय होतात.
- उदा. मॅन्कोझेब,कॉपर,ऑक्सीक्लोराइड.
आंतरप्रवाही बुरशीनाशक (Systemic Fungicide)
- हे फवारणी द्वारे दिल्यानंतर वनस्पतींच्या पानांच्या पर्णरंध्राद्वारे आत मध्ये शोषली जाते व आळवणीद्वारे दिल्यानंतर वनस्पतींच्या मुळांद्वारे आत मध्ये शोषले जाते व आत मध्ये गेल्यानंतर हे बुरशीनाशक बुरशीच्या विरोधात कार्यरत राहते. व बुरशींवर विविध प्रकारच्या क्रिया करून बुरशीना निष्क्रिय करते.
- उदा. कार्बेन्डाझिम,ट्रायसायक्लाझोल
प्रतिबंधक बुरशीनाशक (Preventive Fungicide)
- या बुरशीनाशकांचा वापर कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून केला जातो.
- उदा. सल्फर, झिंक
उपचारात्मक बुरशीनाशक (curative Fungicide)
- या बुरशीनाशकांचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रणात्मक म्हणून केला जातो.
- उदा. मेथिल,थायोफेनेट,ट्रायडिमेफॉन
बुरशीनाशकांचा वापर
पिकांचे संरक्षण : बुरशीनाशकांचा वापर पिकांवर बुरशीजन्य रोग होण्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
फळे आणि भाजीपाला संरक्षण : फळे आणि भाज्यांवर बुरशी लागल्यास त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
बियाणांचे संरक्षण :बियांणा बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी त्यांवर बुरशीनाशकांचा लेप लावाला जातो.
बुरशीनाशक वापरण्याची पद्धत
फवारणी (Spraying): बुरशीनाशक द्रावणाची फवारणी करणे.
आळवणी (Drenching): बुरशीनाशक द्रावण हे पंपाच्या सहाय्याने रोपांच्या बुडाजवळ सोडणे याला आळवणी करणे असे म्हणतात.
ठिबकद्वारे सोडणे (Drip Application ): बुरशीनाशक ठिबक च्या सहाय्याने शेतामध्ये सोडणे.
बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) : बियांण्यावर बुरशीनाशकांचा लेप लावणे.
माती प्रक्रिया (Soil Treatment) : बुरशीनाशक हे रासायनिक खतांबरोबर मिसळणे व शेतामध्ये टाकणे.
बुरशीनाशक वापरताना घ्यायची काळजी
दोषकारक परिणाम : बुरशीनाशकांचा अतिरेकी वापर पर्यावरण मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम करू शकतो.
सुरक्षितता : बुरशीनाशकांचा वापर करताना योग्य साधनांचा वापर करणे, जसे की हातमोजे,मास्क इ.
डोस :प्रत्येक पिकासाठी आणि रोगासाठी योग्य डोस पाळणे आवश्यक आहे.
बुरशीनाशकांचा योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीला मदत होते. मात्र त्यांचा अतिरेकी आणि चुकीचा वापर टाळणे आवश्यक आहे.
रासायनिक बुरशीनाशके खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करणे.