शेतीमध्ये सेन्सर तंत्रज्ञानाचा उपयोग.

May 31, 2024

सेन्सर तंत्रज्ञान म्हणजे विविध प्रकारच्या सेन्सर चा वापर करून पर्यावरणीय परिस्थिती, मातीची स्थिती, पिकांची वाढ आणि इतर शेती संबंधित घटकांची  माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे तंत्रज्ञान आधुनिक शेतीत अचूकता आणण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी वापरले जाते.

सेन्सर तंत्रज्ञानाचे प्रकार

1)मातीतील आर्द्रता सेन्सर

कार्य – मातीतील पाण्याची पातळी मोजतात.

उपयोग – पाण्याची गरज असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे आणि जल व्यवस्थापन सुधारण्यास मदत होते.

2) तापमान सेन्सर 

कार्य – मातीचे आणि वातावरण मधील तापमान मोजतात.

उपयोग – तापमानातील बदलामुळे होणारे नुकसान टाळणे.

3)पोषण सेन्सर

कार्य – मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम इ. पोषण तत्वांची पातळी मोजतात.

उपयोग: योग्य खते वापरून पिकाची पोषण क्षमता वाढवण्यास मदत होते.

4)पर्यावरणीय सेन्सर

कार्य – हवामानाची स्थिती, हवेतील आद्रता , वाऱ्याची दिशा व वेग, प्रकाश इ.घटक मोजतात.

उपयोग – पर्यावरणीय स्थितीचे निरीक्षण करून पिकांच्या वाढीसाठी योग्य उपाययोजना करता येतात.

सेन्सर तंत्रज्ञानाचे फायदे

1)मातीतील आर्द्रता 

  • सेन्सरच्या मदतीने मातीतील आर्द्रतेची पातळी अचूकपणे मोजता येते.
  • पिकांना आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करता येतो, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि पिकांची वाढ सुधारते.
  • योग्य पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते.

  2)तापमान

  • सेन्सर मातीचे आणि वातावरणाचे तापमान सतत मोजतात.
  • योग्य तापमान राखल्यामुळे पिकांची वाढ व विकास चांगला होतो.
  • अचानक होणाऱ्या तापमान बदलांचा प्रभाव कमी करता येतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येते.

3)पोषण तत्त्वे

  • मातीतील पोषण तत्त्वाची पातळी (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) मोजता येते.
  • पोषण तत्वाच्या अचूक माहितीच्या आधारे आवश्यक अन्नद्रव्ये पुरवठा करता येतो.
  • खते वापरात अचूकता आणल्यामुळे अनावश्यक खताचा वापर कमी होतो, त्यामुळे पर्यावरणीय परिणाम कमी होतो.

4)पर्यावरणीय स्थिती

  • हवामानाची स्थिती, तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याची दिशा आणि वेग या सर्व घटकांवर नजर ठेवता येते.
  • प्रकाशाची तीव्रता आणि कालावधी मोजता येतो, ज्यामुळे पिकांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेवर नजर ठेवता येते.
  • कीड व रोगांचा प्रभाव ओळखण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून त्याच्यावर योग्य वेळी उपाययोजना करता येतात.