वनस्पतींच्या अंतर्गत प्रक्रिया (Internal process of plant)

May 27, 2024

वनस्पतींमध्ये विविध अंतर्गत प्रक्रिया घडतात, ज्या त्यांच्या वाढी, विकास आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत. या प्रक्रियांमध्ये पोषक तत्वांचे शोषण, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, बाष्पोउत्सर्जन आणि जल वहन यांचा समावेश होतो.

प्रकाशसंश्लेषण
  • प्रकाश संश्लेषण ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइडचा वापर करून ग्लुकोज स्वरूपात अन्न तयार करतात.

प्रक्रिया

  • समीकरण : 6 CO2+6H2O+सूर्यप्रकाश-C6H12O6+6O2
  • स्थान : ही प्रक्रिया पानांमधील क्लोरोप्लास्ट (Chloroplast)मध्ये घडते.
  • उत्पादन : ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतात. ग्लुकोज ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरला जातो, आणि ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो.
श्वसन प्रक्रिया 
  • श्वसन प्रक्रिया ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये वनस्पती ग्लुकोजचा वापर करून ऊर्जा (ATP) तयार करतात.

प्रक्रिया

  • समीकरण : C6 H12O6+6O2-6CO2+6H2O+ATP
  • स्थान : ही प्रक्रिया मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) मध्ये घडते.
  • उत्पादन : ऊर्जा (ATP) कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाणी तयार होते.ही ऊर्जा विविध क्रियांसाठी वापरली जाते.
बाष्पोउत्सर्जन  
  • बाष्पोउत्सर्जन ही प्रक्रिया आहे. ज्याद्वारे वनस्पतींमधील पाणी बाष्परूपात वातावरणात सोडले जाते.

प्रक्रिया 

  • स्थान : प्रक्रिया पानांवरील स्टोमाटा (Stomata) द्वारे घडते.
  • उत्पादन : पाण्याचे बाष्पीभवन होऊन वनस्पतींच्या तापमानाचे नियंत्रण होते, आणि पाण्याचा प्रवाह वरच्या दिशेने चालू राहतो.
जलवाहन 
  • जलवाहन प्रक्रिया आहे. ज्यामुळे मुळांद्वारे शोषलेले पाणी झायलम (xylem) पेशी द्वारे वनस्पतींच्या विविध भागांपर्यंत पोहोचवले जाते.

प्रक्रिया

  • स्थान : झायलम पेशींच्या माध्यमातून
  • उत्पादन : पाणी आणि खनिजे वनस्पतींच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतात.
पोषक तत्वांचे वहन 
  • पोषक तत्वांचे वहन ही प्रक्रिया आहे. ज्यामध्ये प्रकाश संश्लेषणाने तयार झालेली साखर फोलन पेशीद्वारे वनस्पतींच्या विविध भागांपर्यंत पोहोचवले जाते.

प्रक्रिया

  • स्थान : फोलम पेशींच्या माध्यमातून
  • उत्पादन : साखर आणि इतर पोषक तत्वे वनस्पतींच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतात. ज्यामुळे त्यांची वाढ आणि विकास चांगला होतो.
प्रथिने संश्लेषण 
  • प्रथिने संश्लेषण ही प्रक्रिया आहे. ज्याद्वारे वनस्पती अमिनो ऍसिड पासून प्रथिने  तयार करतात.

प्रक्रिया

  • स्थान : रिबोसोम (Ribosomes) मध्ये.
  • उत्पादन : प्रथिन तयार होतात, ज्यामुळे विविध कार्यांनी संरचना साध्य होतात.
हार्मोनल नियमन 
  • हार्मोनियम नियमन ही प्रक्रिया आहे. ज्याद्वारे वनस्पती वाढ, विकास आणि प्रतिसाद नियंत्रित करतात.

प्रक्रिया

  • उत्पादन – ऑक्सीन (Auxin), सायटोकिनिन (Cytokinin), जिबरेलिन (Gibberellin), एथिलीन (Ethylene) आणि ॲबसिसिक ऍसिड (Abscisic Acide)  हे हार्मोन्स वनस्पतींच्या विविध भागांमध्ये तयार होतात आणि त्यांचे कार्य नियंत्रित करतात.