मातीची रासायनिक गुणवत्ता (Chemical Properties of Soil)

May 30, 2024

मातीची रासायनिक गुणवत्ता म्हणजे रासायनिक घटक आणि त्यांचे गुणधर्म होय. रासायनिक गुणधर्मचा पिकांच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर आणि एकूणच मातीच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. मातीची रासायनिक गुणवत्ता खालील घटकांवर अवलंबून असते.

मातीचा सामू (soil pH)

मातीचा सामू (pH) म्हणजे मातीतील आम्लता किंवा क्षारतीयता मोजणारे प्रमाण हे 0 ते 14 या श्रेणीत मोजले जाते.

  • आम्लीय माती (Acidic soil) – pH 6.5 पेक्षा कमी
  • सामान्य माती (Neutral soil) – pH 6.5 ते 7.3
  • क्षारिय माती (Alkaline soil) – pH 7.3 पेक्षा जास्त

मातीचे pH पिकांच्या पोषण शोषण क्षमतेवर आणि मातीतील जैविक क्रियांवर प्रभाव पाडते.

मातीतील सेंद्रिय पदार्थ (Organic Matter)
  • मातीतील सेंद्रिय पदार्थ म्हणजे विघटित सेंद्रिय पदार्थ जसे की, वनस्पती अवशेष आणि प्राणी अवशेष.
  • सेंद्रिय पदार्थ मातीच्या पोषण क्षमतेसाठी आवश्यक असतात, आणि मातीच्या संरचनेला सुधारण्यास मदत करतात.
मातीतील पोषक तत्वे (Soil Nutrients)

मातीतील प्रमुख पोषक तत्वे

  • मुख्य अन्नद्रव्ये (Macronutrients) – नायट्रोजन (N), पोटॅशियम (K), फॉस्फरस (P),
  • दुय्यम अन्नद्रव्ये (Secondary nutrients)– कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), सल्फर (S).
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये (Macronutrients) – फेरस (Fe), मॅगनीज (Mn), झिंक (Zn), कॉपर  (Cu), मोलिबडेनम (Mo), बोरॉन (B), क्लोरीन (Cl)
मातीची क्षारता (Soil salinity) 
  • मातीमध्ये विरघळलेल्या क्षणाचे प्रमाण म्हणजे मातीची क्षारता होय.
  • अधिक क्षारता मातीच्या पाणी शोषण क्षमतेवर परिणाम करते ज्यामुळे त्याचा  पिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
मातीतील कार्बोनेटस आणि बायकार्बोनेटस (Carbonates and bicarbonates)
  • मातीमध्ये उपस्थित कार्बोनेटस आणि बायकार्बोनेटस पिकांच्या पोषण शोषणावर आणि मातीच्या pH वर प्रभाव पाडतात.
कॅटायन एक्सचेंज क्षमता (Cation Exchange Capacity)
  • मातीची कॅटायन एक्सचेंज क्षमता म्हणजे मातीच्या कणांवर विद्युत शक्तीने धरून ठेवलेले धनायन (कॅटायन) बदलण्याची क्षमता होय.
  • उच्च (CEC) असलेली माती अधिक पोषणक्षम असते.
मातीतील विषारी घटक (Toxic Elements)
  • कधीकधी मातीमध्ये विविध विषारी घटक जसे की, आर्सेनिक,  कॅडामियन, लीड आणि मर्क्युरी उपस्थित असू शकतात.
  • हे घटक पिकांच्या वाढीसाठी आणि मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
मातीतील जैविक क्रियेवर परिणाम (Biological Activity)
  • मातीतील जैविक क्रीयेमध्ये सूक्ष्मजीवांची क्रिया आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास केला जातो.
  • मातीतील रासायनिक गुणधर्म मातीतील जैविक घटकांवर,त्यांच्या  क्रियांवर व  पोषण क्षमतेवर आणि आरोग्यावर प्रभाव पाडतात.
मातीची रासायनिक चाचणी (Soil Chemical Testing)
  • मातीचा रासायनिक गुणधर्माचे परीक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, PH चाचणी इलेक्ट्रिक कंडाकर्टिव्हीटी (EC) चाचणी, पोषक तत्वांची चाचणी इ.
  • मातीच्या रासायनिक गुणधर्माचे परीक्षण आणि योग्य व्यवस्थापन केल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊ शकते. आणि मातीचे आरोग्य सुधारता येऊ शकते.