मातीची भौतिक गुणवत्ता (Soil Physical Properties)

May 30, 2024

मातीची भौतिक गुणवत्ता म्हणजे मातीच्या विविध भौतिक गुणधर्माचे अभ्यास. हे गुणधर्म मातीच्या रासायनिक व जैविक गुणधर्मांसह तिच्या पीक उत्पादन क्षमतेवर व एकूण पर्यावरणीय आरोग्यावर प्रभाव पडतात. मातीची भौतिक गुणवत्ता खालील मुख्य घटकांवर अवलंबून असते.

मातीची रचना (Soil Texture)

मातीच्या कणांची रचना आणि आकार मातीच्या रचनेवर परिणाम करतात. माती तीन प्रकारच्या कणांनी बनलेले असतात.

  • वाळूसार माती  – याचे कण मोठे असतात आणि त्यामुळे यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी असते.
  • गाळाची माती -मध्यम आकाराचे कण असतात आणि यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाळूसार मातीच्या तुलनेत अधिक असते.
  • काळी माती  – छोटे कण असतात आणि यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता सर्वाधिक असते.
मातीची घनता (Soil Density)
  • संपूर्ण घनता(Bulk Density): मातीच्या संपूर्ण प्रमाणाचा मोजमाप ज्यामध्ये मातीच्या कणांसोबत रिकाम्या जागाही सामील असतात.
  • मातीचे कण घनता(Particle Density)-मातीच्या कणांची घनता, ज्यामध्ये फक्त कणांचा माप समाविष्ट असतो.
मातीची संरचना (Soil Structure)
  • मातीच्या कणांचे एकत्र येऊन बनलेले समूह म्हणजे मातीची संरचना होय. मातीचे समूह विविध प्रकारचे असू शकतात.
मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (Soil Water holding capacity)
  • मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे मातीमध्ये किती प्रमाणात पाणी साठले जाऊ शकते, यावर मातीची रचना  मुख्यतः प्रभाव टाकतात.मृत्तिका मातीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता अधिक असते तर रेतीत कमी असते.
मातीचा रंग (Soil Colour)
  • मातीचा रंग तिच्या खनिज घटकांवर आणि जैविक घटकांवर अवलंबून असतो. उदा. लाल मातीमध्ये लोखंडाचे ऑक्साईड अधिक प्रमाणात असते तर काळ्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त असतात.
 मातीची स्थिरता (Soil consistency)
  •  मातीचे कण एकमेकांशी कितपत घट्ट जोडलेले आहे हे मातीची स्थिरता ठरवते. यामुळे मातीच्या लागवडीच्या प्रक्रियेवर आणि पिकांच्या मुळांवर परिणाम होतो.
मातीचे तापमान (Soil Temperature)
  •  मातीचे तापमान तिच्या भौतिक व जैविक गुणधर्मावर प्रभाव पडते. उच्च तापमानात सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होते.
मातीची वाफसा स्थिति (Soil Porosity)
  •  मातीच्या वाफसा स्थितीचा अर्थ मातीच्या दोन कणांमध्ये असणारे पाणी व हवेचे गुणोत्तर होय.
मातीची चाचणी (Soil Testing)
  • मातीच्या भौतिक गुणधर्मांचे परीक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात जसे की, मातीची संरचना चाचणी, पाणी धारण क्षमता चाचणी, घनता चाचणी इ.
  • मातीच्या भौतिक गुणधर्मांची योग्य माहिती असल्यास शेतकरी त्याच्या शेतात पिकांची अधिकाधिक उत्पादकता मिळविण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करू शकतात.