नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनात कशी वाढ करावी?

May 31, 2024

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत झालेल्या सुधारणा आणि नव्या पद्धतींमुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील एक महत्त्वाची पद्धत म्हणजे प्रिसिजन ॲग्रीकल्चर (Precision Agriculture) किंवा अचूक शेती या पद्धतीच्या माध्यमातून शेतीत अचूकता आणली जाते, ज्यामुळे पिकांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होते. खालील प्रमाणे अचूक शेतीतील  पीक उत्पादनावर होणारा परिणाम दिला आहे.

ड्रोन तंत्रज्ञान
  • ड्रोन च्या मदतीने पिकांची नोंद घेता येते. पाण्याची गरज, खते, कीड व रोगाची माहिती त्वरित मिळते.
  • ड्रोनच्या मदतीने वेळेवर औषधे व खते फवारणी केल्यामुळे पिकांची उत्पादकता वाढते.
  • ज्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करणे शक्य नाही अशा पिकात ड्रोन च्या सहाय्याने फवारणी करता येते.(उदा. ऊस)
 सेन्सर तंत्रज्ञान 
  • मातीतील आद्रता , तापमान, पोषण तत्वे आणि पर्यावरणीय परिस्थितीवर सतत नजर ठेवता येते.
  • योग्य वेळी योग्य पाण्याचा व खते पुरवठा केल्यामुळे पिकांची वाढ सुधारते.
  • वातावरण बदलांमुळे पिकावर येणाऱ्या किडी व बुरशीजन्य रोगांचा अगोदरच अंदाज लावता येतो व त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात.
जीआयएस 
  • शेताची भूमी, माती, हवामान आणि पिकांच्या वाढीची माहिती मिळते.
  • त्याचबरोबर शेतामध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पन्नचा अंदाज लावता येतो.
  • या आधारे केलेल्या  नियोजन आणि व्यवस्थापनामुळे उत्पादकता वाढवता येते.
रोबोटिक्स 
  • शेतात स्वयंचलितपणे कामे करण्यासाठी, जसे की पिक लागवड, तण काढणी, फवारणी इ.
  • वेळेवर आणि अचूक पद्धतीने केलेल्या कामांमुळे उत्पादकता वाढते.
बिग डेटा आणि क्लाऊड कम्प्युटिंग
  • शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डेटा मिळवून त्याचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
  • सुधारित निर्णयक्षमतेमुळे उत्पादनात वाढ होते.
  • योग्य प्रमाणात पाणी आणि खते वापरल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
  • अनावश्यक पाण्याचा निचरा होतो  आणि कीटकनाशकांचा खर्च कमी होतो.
  • कमी रसायनांचा वापर केल्यामुळे पर्यावरणावर कमी परिणाम होतो.
  •  कमी रसायनांचा वापर केल्यामुळे आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्नधान्य उत्पादन होते.
  • अचूक उपायोजनांमुळे उत्पादनाच्या प्रमाणात वाढ होते.