कमी किंवा जास्त तापमानाचा पिकांच्या वाढीवर आणि विकासावर कसा परिणाम होतो.

May 27, 2024

वनस्पतींच्या वाढीवर आणि विकासावर तापमानाचा मोठा प्रभाव असतो. तापमान कमी किंवा जास्त असल्यास वनस्पतींच्या विविध प्रक्रियांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो.

कमी तापमानाचा परिणाम 

वनस्पतींच्या अंतर्गत प्रक्रिया कमी होणे

  • कमी तापमानात  एन्झाइमची क्रियाशीलता कमी होते. एन्झाइम्स हे प्रथिने असतात. जे विशिष्ट तापमानात सर्वाधिक कार्यक्षम असतात. तापमान कमी झाल्यास एन्झाइम्सची कार्यक्षमता कमी होते, आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि इतर जैविक प्रक्रिया मंदावतात.
  • प्रकाश संश्लेषणात आवश्यक असलेल्या एन्झाइम्सची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे वनस्पतींना ऊर्जा निर्मिती कमी होते, व रोपांची वाढ खुंटते.

 वाढ कमी होणे

  • पेशी विभाजनासाठी आणि वाढीसाठी योग्य तापमान आवश्यक असते. कमी तापमानात पेशी विभाजनाची गती कमी होते, यामुळे वनस्पतींच्या विविध अवयवांची वाढ मंदावते.
  • परिणामी वनस्पतींची वाढ, पानांची संख्या आणि खोडांची जाडी कमी होते, यामुळे एकूणच वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

फुलांचे व फळांचे नुकसान 

  • काही वनस्पतींना फुल आणि फळे धारणा करण्यासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. कारण या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
  • विशेषत: फळांच्या तयार होण्याच्या काळात कमी तापमानामुळे फळांची गुणवत्ता कमी होते, आणि उत्पादनात घट होते.

पाणी शोषण 

  • कमी तापमानात मुळांच्या क्रियाशीलतेत घट होते. ज्यामुळे पाणी शोषण क्षमता कमी होते. परिणामी वनस्पतींना पाणी आणि आवश्यक पोषणद्रव्ये मिसळण्यास अडचणी येतात.
  • मुळांची वाढ कमी झाल्यामुळे पाणी शोषणाची क्षमता कमी होते, आणि वनस्पतींमध्ये जलसाठा कमी होतो. ज्यामुळे वनस्पतींच्या वाढ आणि विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
  • या सर्व कारणांमुळे कमी तापमान वनस्पतींच्या वाढीसाठी प्रतिकूल असते आणि योग्य तापमान राखणे आवश्यक असते.
जास्त तापमानाचा परिणाम 

जलसंवर्धन वाढते 

  • जास्त तापमानात  बाष्पोउत्सर्जन (Transpiration) गती वाढते. तापमान वाढल्यामुळे ही प्रक्रिया जास्त वेगाने होते, ज्यामुळे वनस्पतींना अधिक पाण्याची आवश्यकता भासते.
  • पाणी उपलब्ध नसेल तर वनस्पतींना पाण्याचा ताण येतो, ज्यामुळे त्यांची वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

प्रकाशसंश्लेषण 

  • जास्त तापमानात  प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता कमी होते.  प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या काही एन्झाइम्स आणि प्रोटीन्स तणामुळे डिनॅचरल होतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी कार्यक्षम होते.
  • प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे वनस्पतींना आवश्यक ऊर्जा आणि अन्नद्रव्ये निर्माण करण्यात अडचणी येतात.

श्वसन दर वाढणे

  • जास्त तापमानात श्वसन दर (Respiration rate) वाढतो.
  • श्वसन प्रक्रियेत साखरेचा वापर होऊन ऊर्जा निर्मिती होते.
  • परंतु जास्त तापमानामुळे  ही प्रक्रिया अधिक वेगाने होते.
  • यामुळे ऊर्जा आणि साखरेचा जास्त वापर होतो, ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा आणि पोषण कमी पडते.

तापमानाचा ताण 

  • जास्त तापमानामुळे वनस्पतींना तापमान ताण (हिट स्ट्रेस) येतो.
  • वातावरण तापमान वाढीच्या ताणामुळे प्रोटीनचे डिनॅचरल , कोशिका संरचनेत बदल आणि हार्मोन संतुलनात बिघाड होतो.
  • वातावरण ताणामुळे वनस्पतींच्या विविध जैविक प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे त्यांची सामान्य वाढ आणि विकास बाधीत होतो.
वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य तापमानाचे फायदे

प्रकाश संश्लेषण कार्यक्षमतेत वाढ 

  • योग्य तापमानामुळे एन्झाइम्सची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील उच्च कार्यक्षमतेमुळे वनस्पतींना अधिक ऊर्जा आणि अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

श्वसन प्रक्रियेतील संतुलन

  • योग्य तापमानात श्वसन प्रक्रियेचा दर संतुलित राहतो, ज्यामुळे वनस्पतींच्यामध्ये ऊर्जा आणि साखरेचा योग्य वापर होतो. ऊर्जा आणि पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वनस्पतींची वाढ आणि विकास संतुलित राहतो.

पेशी विभाजन आणि वाढ 

  • योग्य तापमानात पेशी विभाजनाची गती वाढते, ज्यामुळे वनस्पतींचे अवयव जलद गतीने वाढतात. पानं, आणि मूळ यांची वाढ जलद गतीने होते, ज्यामुळे वनस्पतींची उंची, जाडी आणि पानांची संख्या वाढते.

 पाणी शोषण आणि पोषक द्रव्यांची उपलब्ध 

  • योग्यता मनात मुळांची क्रियाशीलता उच्च असते, ज्यामुळे पाणी शोषणाची क्षमता वाढते, पाण्यासह इतर आवश्यक पोषणद्रव्ये वनस्पतींना अधिक प्रमाणात मिसळतात, ज्यामुळे त्यांचे एकूण आरोग्य सुधारते.

फुल आणि फळांचा विकास 

  • योग्य तापमानामुळे हार्मोन्सचे संतुलन योग्य राहते, ज्यामुळे फुलं आणि फळांचा विकास चांगला होतो. फुलं आणि फळांची गुणवत्ता आणि संख्या सुधारते, ज्यामुळे एकूण उत्पादनात वाढ होते.

ताण प्रतिकार क्षमता 

  • योग्य तापमान वनस्पतींची ताण सहनशक्ती सुधारते, ज्यामुळे त्या उच्च तापमान किंवा इतर ताण परिस्थितींना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात.
  • योग्य तापमानामुळे वनस्पतींचे सामान्य जीवनचक्र सुरळीत चालते आणि त्या नैसर्गिक विकास क्रमानुसार वाढतात.