Drip Irrigation Pipe - Farmspot

Drip Irrigation Pipe

Drip irrigation is a method of delivering water directly to the roots of plants, so the water does not evaporate. 50% of water is saved, so we can get a good yield even in less water. Through this irrigation method, the crop can be watered as per the requirement. Which helps in increasing the yield, by watering in a controlled manner, the weeds coming into the field come in less quantity, as well as reduce soil erosion. Due to the maximum return condition in the domain of the direct roots, it is well exploited by the roots, which allows more produce to be obtained at a lower cost., Drip irrigation comes in a variety of different types, including two types of non-lSI and ISI drip. At the same time, drips are also available in two types of 16mm and 20mm. If the length of your field is less than 200 feet, use a 16 mm drip and if the length of your field is more than 200 ft, you should use a drip of 20 mm. At the same time, according to the discharge of water, there are two types of it. If you are growing vegetable crops then you should use a drip with a discharge of 2.5 liters and if you are taking sugarcane, ginger and other fruit crops, you should use a drip with a discharge of 4 liters.
Buy Now

Description

ठिबक सिंचन ही थेट रोपांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची एक पद्धत आहे, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. पाण्याची 50 टक्के बचत होते, त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न घेऊ शकतो. या सिंचन पद्धतीद्वारे पिकास गरजेनुसार पाणी देता येते.

ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते नियंत्रण पद्धतीने पाणी दिल्याने शेतामध्ये येणारे तण  कमी प्रमाणामध्ये येते, त्याचबरोबर जमिनीची धूप कमी प्रमाणात होते, थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वापसा कंडीशन राहिल्यामुळे मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते, ज्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येते.

ठिबक सिंचनामध्ये विविध प्रकार येतात ज्यामध्ये Non lSI ISI ठिबक असे दोन प्रकार येतात. त्याचबरोबर 16mm 20 mm  अशा दोन प्रकारांमध्ये सुद्धा ठिबक उपलब्ध असतात.

जर आपल्या शेताची लांबी 200 फूट पेक्षा कमी असेल तर 16 mm  ठिबक वापरावे व आपल्या शेताची लांबी 200 ft पेक्षा जास्त असेल तर आपण 20 mm  चे ठिबक वापरावेत. त्याचबरोबर पाण्याचा डिस्चार्ज नुसार त्यामध्ये दोन प्रकार येतात.

जर आपण भाजीपाला पिके घेत असू तर आपण 2.5 लिटर डिस्चार्ज असणारी ठिबक वापरावे आणि जर ऊस, आले व इतर फळे पिके घेत असाल तर आपण 4 लिटर डिस्चार्ज असणारे ठिबक वापरावे.