उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकाची काळजी कशी घ्यावी?

April 29, 2024

या आठवड्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. अशातच आता मध्य महाराष्ट्र,विदर्भ,व मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांच्या गडगडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा अवकाळी पाऊस काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन नाही. महाराष्ट्रातील शेतकरी  कायमच अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असतो. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण अशा स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकाची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकावर खालील अडचणी येत असतात.

अवकाळी पाऊस पडण्या अगोदर वातावरणात मोठ्या प्रमाणावर तापमानात व आद्रतेमध्ये वाढ होते व दुपारच्या नंतर तापमानामध्ये घट होऊन वातावरण थंड होते व पाऊस पडतो याच वातावरण बदलामुळे टोमॅटो रोपांवर अजैविक असा ताण येतो .ज्यामुळे जी टोमॅटो रोपे रोपवाढीच्या अवस्थेत असतात त्या रोपांच्या पानांच्या वाट्या होणे, वाढ खुंटणे यांसारख्या अडचणी येतात. जी टोमॅटो रोपे फुलअवस्थेत असतात अशा रोपांच्या फुलांची गळ मोठ्या प्रमाणावर होते. जी रोपे फळधारणेच्या किंवा फळ फुगवणीच्या अवस्थेत असतात अशा टोमॅटो रोपांच्या पानांच्या वाट्या  होतात, रोपांची वाढ खुंटते,शेंडा थांबतो यांसारख्या अडचणी येतात. व ज्या टोमॅटो रोपांची फळ तोडणी सुरू आहे, अशा टोमॅटो रोपांची फळे लवकर लाल होतात व लहान आकाराची फळे सुद्धा लवकर लाल होतात यांसारख्या अडचणी येत असतात या अडचणी रोपांवर आलेला अजैविक ताण यामुळे येतात.

अवकाळी पाऊस हा जर का मुसळधार पडला तर शेतामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शेताच्या बाहेर वाहून जाते व त्या पण्याद्वारे अन्नद्रव्ये सुद्धा शेताच्या बाहेर वाहून जातात परिणामी सूक्ष्म, दुय्यम व मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता भासते ज्यामुळे हरितकणांचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळी पडतात, पानांचा आकार लहान होतो ,पानांच्या वाट्या होतात, निघणारे शेंडे पिवळे निघतात यांसारख्या अडचणी येतात.

अवकाळी  पाऊसाबरोबर जोरदार सोसाट्याचा वारा येत असतो ज्यामुळे रोपे जर वाढीच्या अवस्थेत असतील व त्यांची पहिली बांधणी झाली नसेल तर वाऱ्यामुळे रोपे कोलमडतात. रोपांची जर का फुलअवस्था सुरू असेल व दुसरी बांधणी केली नसेल तर फांद्या मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पडतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होते. रोपांची जर का  फळधारणेची किंवा फळफुगवणीची अवस्था सुरू असेल व बांधणी झाली नसेल तर फळांची गळ मोठ्या प्रमाणामध्ये होते.

अवकाळी पावसाबरोबर जर का गारा पडल्या तर रोपांची पाने तुटतात त्यामुळे रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते तसेच पानांना झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो.

अवकाळी पाऊस पडल्यामुळे रोपांच्या खालील पानांवर माती उडते ज्यामुळे रोपांवर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या मातीद्वारे होतो.जर आपला टोमॅटो प्लॉट 30 दिवसांचा असेल तर प्लॉटवर सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफायलियम राखाडी ठिपके, लवकर येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.जर आपला टोमॅटो प्लॉट 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान असेल तर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफायलियम राखाडी ठिपके,टोमॅटो लिफ मोल्ड, डाऊनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.जर आपला टोमॅटो प्लॉट हा 45 ते 70 दिवसांच्या दरम्यान असेल तरस्टेमफायलियम राखाडी ठिपके, डाऊनी, टोमॅटो लीफ मोल्ड, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. आणि जर का आपल्या टोमॅटो प्लॉटची तोडणी सुरू असेल तर डाऊनी, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात जर का मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असेल तर टोमॅटो रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. जर आपला प्लॉट लागवड ते 25 दिवसांच्या दरम्यान असेल तर पिथियम , रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन रोपांची मर होते व जर का आपला टोमॅटो प्लॉट 30 दिवसांच्या पुढील असेल तर फ्युसॅरियम व फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपांची मर होते.

काही परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस हा सायंकाळी किंवा उशिरा येतो व पुढील 2  ते 3 दिवस ढगाळ वातावरण असते. अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो रोपांवर झांतोमोनास या जिवाणूमुळे जिवाणूजन्य काळे ठिपके या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

”अशाप्रकारे अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या अडचणी येतात.”

वरील अडचणींवर खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.

  • जेव्हा रोपांवर अवकाळी पाऊस पडण्या अगोदर व अवकाळी पाऊस पडल्यानंतर जे वातावरण बदल होते यामुळे जो अजैविक ताण येतो तो ताण कमी करण्यासाठी व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालीलपैकी एका प्रकारच्या उत्पादनाची फवारणी करा.

1 )  सिव्हिड उत्पादने   किंवा  अमिनो उत्पादने.

*Pasura – Biospark

*Crystal Nutrogen

*Valagro -Mc -Extra

*Kaybee -Novazyme

*Biostadt -Biozyme

*Syngenta -Isabion

* PI- Biovita

*Bayer Ambition

* Valagro Megafol

2) सिलिकॉन उत्पादने.

*Privi silixol

3) झिंक युक्त उत्पादने.

*PR Rexolin Zn

*Yara vita zintrac

  • जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो व शेतातून पाणी बाहेर वाहून जाते व ज्याद्वारे जमिनीतील अन्नघटक वाहून जातात व अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते हीच कमतरता भरून काढण्यासाठी खालील 3 खत नियोजन ठिबक द्वारे 2 दिवसांच्या फरकाने सोडा.

 जर प्लॉट 15 ते 45 दिवसांच्या दरम्यान असेल तर.

नियोजन 1.

Compo -13:40:13

प्रमाण-4 kg प्रति एकर

किंवा

13:40:13

प्रमाण-4 kg प्रति एकर

+

मॅग्नेशियम सल्फेट

प्रमाण-4 kg प्रति एकर

(  13:40:13 व मॅग्नेशियम सल्फेट एकत्रितपणे दिल्यामुळे जमिनीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होते.)

नियोजन 2

Micronutrient

प्रमाण- 1 kg प्रति एकर

Isabion

प्रमाण- 1  लिटर  प्रति एकर

नियोजन 3

13:00:45

प्रमाण-4 kg प्रति एकर

Calcium Nitrate

प्रमाण-4 kg प्रति एकर

  • अवकाळी पावसाबरोबर जोरदार सोसाट्याचा वारा येतो त्यामुळे रोपांची पडझड होते व नुकसान होतील ती पडझड होऊ नये म्हणून टोमॅटोची बांबू तारेचे जे स्ट्रक्चर असते ते मजबूत करावे त्याचबरोबर रोपाची लागवड झाल्यानंतर 25 व्या दिवशी पहिली बांधणी करून घ्यावी व 40 ते 45 दिवसांनी दुसरी बांधणी करावी जेणेकरून वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळता येते.

अवकाळी पाऊस पडल्यामुळे टोमॅटो रोपांच्या खालील पानांवर माती उडते व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या मातीद्वारे होतो तसेच गारपीट झाल्यामुळे रोपांची पाणी फाटतात व जखमा होतात व त्या जखमांमधून  बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो .म्हणून रोपांच्या वाढीच्या अवस्थेवरून खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा किंवा बुरशीनाशक जोडीचा वापर करावा.

 

1)रोप लागवडीनंतर 15 ते रोपलागवडीनंतर 30 दिवसांच्या दरम्यान आपला प्लॉट असेल तर खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

1.Tata master

(Mancozeb 64%+ Metalxyl 80%  WP)

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

2.Syngenta Ridomil Gold

(Mancozeb 64%+ Metalxyl 40%  WP)

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

3.Syngenta Foliogold

(Chlorothalonil 33.1 +Metalxyl 3.1% SC)

प्रमाण-2 ml प्रति लिटर

किंवा 

4.UPL Saaf

(Mancozeb 64%+ Carbendenzim 12% WP)

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

2) रोप लागवडीनंतर 30 ते रोपलागवडीनंतर 40 दिवसांच्या दरम्यान आपला प्लॉट असेल तर खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा  किंवा बुरशीनाशक जोडीचा वापर करावा.

1.Syngenta kavach

( Chlorothalonil 70% WP)

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

+

Syngenta Score

(Difencorazole 25 % EC )

प्रमाण-1 ml प्रति लिटर

किंवा 

2.Bayer Antracol

(Propineb 70%WP)

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

+

Bayer Buonos

(Tebuconazole 39.39 %EC)

प्रमाण-0.75 ml प्रति लिटर

किंवा 

3.Tata Captaf

(Captan 50 % WP )

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

+

Tata Contaf Plus

(Hexaconazole 50% SC )

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

3)रोप लागवडीनंतर 40 ते रोपलागवडीनंतर 50 दिवसांच्या दरम्यान आपला प्लॉट असेल तर खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा  किंवा बुरशीनाशक जोडीचा वापर करावा.

1.Syngenta Amistar

(Azoxystrobin 23% SC )

प्रमाण-1 ml प्रति लिटर

+

Syngenta Cuman L

(Ziram 27.5 % SC )

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

किंवा 

2.UPL Avancer Glow

(Azoxystrobin 8.3 % + Mancozeb 66.7% WG )

प्रमाण-2  ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

3.BASF Cabrio Top

(Metiram  55%  +Pyraclostrobin 50% WG)

प्रमाण-  2.5 ग्रॅम प्रति लिटर

4)रोप लागवडीनंतर 50 ते रोपलागवडीनंतर 60 दिवसांच्या दरम्यान आपला प्लॉट असेल तर खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा  किंवा बुरशीनाशक जोडीचा वापर करावा.

1.Bayer Melody Duo

(Iprovalicarb 5.5 % + propineb 61.25 % WP )

प्रमाण-  2.5 ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

2.BASF Acrobat

(Dimethomorph 50 % WP )

प्रमाण-  1 ग्रॅम प्रति लिटर

+

BASF Polyram

(Metiram 70 % WG )

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति लिटर

किंवा

3.Syngenta Revus

( Mandipropamid 23.4 % SC )

प्रमाण- 1ml प्रति लिटर.

+

Syngenta Cuman L

(Ziram 27.5 % SC )

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

5)रोप लागवडीनंतर  60 दिवसांच्या पुढे आपला प्लॉट असेल तर खालीलपैकी एका बुरशीनाशकाचा  किंवा बुरशीनाशक जोडीचा वापर करावा.

1.Dupont Curzate

(Mancozeb 64% + Cymoxanil 80 % WP )

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

2.Dupont equation Pro

(Famoxadone 16.6 % + Cymoxanil 22.1 % SC )

प्रमाण- 1 ml प्रति लिटर.

+

Syngenta Cuman L

(Ziram 27.5 % SC )

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

  • अवकाळी पाऊस पडल्यानंतर जर शेतात पाणी साठते ज्यामुळे रोपांची मर होऊ नये म्हणून खालीलपैकी एका जैविक किंवा सेंद्रिय किंवा रासायनिक बुरशीनाशकाचा वापर रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार करावा.

*जैविक बुरशीनाशक

1.ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास जिवाणू

प्रमाण -1  लिटर प्रति एकर.

*सेंद्रिय बुरशीनाशक

1.Kaybee Root fit

प्रमाण -1  लिटर प्रति एकर.

किंवा 

2.Rootonic

प्रमाण -1  लिटर प्रति एकर.

*रासायनिक बुरशीनाशक

1.Syngenta Foliogold

(Chlorothalonil 33.1% + Metalxyl 3.1 % SC )

प्रमाण -1  लिटर प्रति एकर.

किंवा 

2.Syngenta Ridomil Gold

(Mancozeb 64% + Metalxyl 80% WP )

प्रमाण -1 kg प्रति एकर.

किंवा 

3.Tata Master

(Mancozeb 64% +Metalxyl 80 % WP )

प्रमाण -1 kg प्रति एकर.

किंवा 

4.UPL Saaf

(Mancozeb 64% + Carbendenzim 12% WP )

प्रमाण -1 kg प्रति एकर.

  • अवकाळी पाऊस जेव्हा रात्री किंवा सायंकाळी पडल्यानंतर 7 तासांपेक्षा जास्त पाणी साठवून राहिले व सतत ढगाळ वातावरण असेल तर झँथोमोनास जिवाणूजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो तो होऊ नये म्हणून रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खालीलपैकी एका बुरशीनाशक  व जीवाणूनाशक उत्पादनाचा वापर करावा.

1) रोप लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांच्या दरम्यान खालील  बुरशीनाशक व जीवाणूनाशक जोडीचा वापर करावा.

1.Crystal Blue Copper

(Copper oxychloride 50% WP )

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति लिटर

                     +

Crystal Cristocycline

(Streptomycin Sulphate 90%+ Tetracycline hydrochloride 10%SP)

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति 15 लिटर

 

2)रोप लागवडीनंतर पहिल्या 30 दिवस  ते 60 दिवस दरम्यान खालील बुरशीनाशक व जीवाणूनाशक उत्पादनाचा वापर करावा.

1.Dhanuka Zanet

(Thiophanate Methyl 38% + kasugamycin 2.2 % SC )

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

किंवा 

2.Biostadt Roko

(Thiopnanate Methyl 70 % WP )

प्रमाण-  1.5 ग्रॅम प्रति लिटर

+

Dhanuka Kasu -b

(Kasugamycin 3% SL)

प्रमाण- 2 ml प्रति लिटर.

3)रोप लागवडीनंतर पहिल्या  60 दिवसांच्या दरम्यान खालील बुरशीनाशक व जीवाणूनाशक उत्पादनाचा वापर करावा.

1.Dhanuka Conika

(copper oxychloride 45% + Kasugamycin 50%WP)

प्रमाण-  1 ग्रॅम प्रति लिटर

किंवा 

2.Crystal Blue Copper

(copper oxychloride 50% WP )

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति लिटर

+

Dhanuka  Kasu-B

(Kasugamycin 3% SL )

प्रमाण-  2 ml प्रति लिटर

किंवा 

3.Dupont  Curzate

(Mancozeb 64% + Cymoxanil 8% WP )

प्रमाण-  2 ग्रॅम प्रति लिटर

+

Dupont kocide 2000

(Copper hydroxide 53.8%DF)

काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस गारपीट होते ज्यामुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणावर होते. पाऊस पडल्यानंतर फळे खाली पडली आहेत ती गोळा करून शेताच्या बाहेर फेकून द्यावीत.

अशाप्रकारे अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटोमध्ये अडचणी येतात त्यावर वर दिल्याप्रमाणे परिस्थितीचा अभ्यास करून वापर करावा.