Bayer Folicure
Description
Bayer Folicure या बुरशीनाशकामध्ये टेबुकोनॅझोल 25.9% इ सी हा ट्रायझोल या गटातील आंतरप्रवाही रासायनिक घटक असतो..हे बुरशीनाशक फवारणीनंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे व आळवणी किंवा ठिबक द्वारे दिल्यानंतर मुळांच्या रंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या पेशींद्वारे वनस्पतींच्या सर्व भागापर्यंत पोहोचते.
हे वनस्पतींच्या पर्णरंद्रामधून किंवा मुळांच्या रंद्राद्वारे तसेच वनस्पतींच्या जखमांमधून आत मध्ये प्रवेश केलेल्या बुरशींचा संपूर्णपणे नायनाट करते. तसेच कोणत्याही बुरशीला आत मध्ये प्रवेश करू देत नाही. हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशीभित्तिकांमध्ये असणाऱ्या एर्गो स्टेरालचे जैवसंश्लेषण थांबवते ज्यामुळे बुरशीच्या पेशी निर्मिती मध्ये अडथळा येतो परिणामी बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होतात.
या बुरशीनाशकाचा वापर कोणतेही बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व आल्यावर उपचारात्मक नियंत्रणासाठी केला जातो. हे बुरशीनाशक फवारणीसाठी वापरले जाते.
या बुरशीनाशकाचे प्रमाण फवारणीसाठी 0.75 ml ते 1 ml प्रति लिटर असे वापरावे. याचा वापर सर्व पिकांमध्ये(काही अपवाद) केला जातो.हे पानांवर येणारी काळे ठिपके,भुरी जिवाणूजन्य ठिपके व करपा, पर्पल ब्लॉच,अंथराकोज करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करते.
या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकांत रोप लागवड नंतर तीस दिवसांनी antracol या बुरशीनाशकाबरोबर केल्यास भुरी,काळे ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
या बुरशीनाशकाचा वापर कांदा पिकांत रोप लागवड नंतर तीस दिवसांनी antracol या बुरशीनाशकाबरोबर केल्यास भुरी, सरकोस्पोरा ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.